शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पोलिसांनी कारवाई न केल्याने निखीलला गमवावा लागला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:36 IST

२४ तासांपूर्वी भावावर झालेल्या खुनीहल्ल्यात शांतिनगर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे निखील मेश्राम याला जीव गमवावा लागला. शांतिनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या निखीलच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आरोपी सोलंकी कुटुंबाने योजनाबद्ध पद्धतीने निखीलची हत्या केली. मनपा कर्मचारी असलेल्या निखीलच्या हत्येमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

ठळक मुद्दे२४ तासापूर्वीच भावावर झाला होता हल्लायोजनाबद्ध पद्धतीने खून केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २४ तासांपूर्वी भावावर झालेल्या खुनीहल्ल्यात शांतिनगर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे निखील मेश्राम याला जीव गमवावा लागला. शांतिनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या निखीलच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आरोपी सोलंकी कुटुंबाने योजनाबद्ध पद्धतीने निखीलची हत्या केली. मनपा कर्मचारी असलेल्या निखीलच्या हत्येमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.रविवारी रात्री रामसुमेरबाबानगर, शांतिनगर येथील रहिवासी २८ वर्षीय निखील दिगांबर मेश्राम याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात निखीलचा भाऊ विक्की, वहिनी प्रियंका, आई ललिता, बहीण मनीषा, भाऊजी इंद्रपाल मडकवार, विजय वासनिक आणि मित्र गोविंदा राऊत जखमी झाले होते. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.सूत्रानुसार आरोपी सोलंकी परिवाराचे मेश्राम कुटुंबाशी जुना वाद आहे. आरोपींना शंका आहे की, त्यांच्या मुलीचे निखीलचा भाऊ विक्कीसोबत प्रेमसंबंध आहेत. निखील आणि विक्की मनपा कर्मचारी आहेत. निखील डाक विभागात तर विक्की आरोग्य विभागात कार्यरत आहे. आठ महिन्यांपूर्वी सोलंकी कुटुंबाने विक्कीच्या विरुद्ध तक्रारही दाखल केली होती. सोलंकी परिवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने निखील आणि विक्कीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.१९ मे रोजी रात्री विक्की ड्युटीवरून घरी आला होता. रात्री ८.३० वाजता मित्राच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घरून रवाना झाला. घराजवळच सोलंकी परिवाराने विक्कीसोबत वाद घातला. त्याला मारहाण केली. विक्की या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी शांतिनगर पोलीस ठाण्यात गेला. तेव्हा सोलंकी परिवार अगोदरच ठाण्यात पोहोचला होता. सोलंकी परिवाराच्या दबावात पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला, परंतु कुठलीही कारवाई केली नाही. तक्रार नोंदविल्यामुळे सोलंकी परिवाराला पुन्हा राग आला. त्यांनी निखील व विक्कीला धडा शिकविण्याचा निश्चय केला.रविवारी सायंकाळी निखीलच्या घरी पाहुणे आले होते. त्यामुळे निखील व विक्की आपल्या विरुद्ध लोक एकत्र करीत असल्याचा सोलंकी कुटुंबाला संशय आला. पाहुणे गेल्यावर रात्री ९.३० वाजता सोलंकी कुटुंबीयांनी निखीलच्या घरावर दगडफेक करीत हल्ला केला. तेव्हा घरासमोर विक्की, त्याचे भाऊजी आणि कुटुंबातील इतर सदस्य बसले होते. धोका ओळखून भाऊजीने विक्कीला घराच्या आत नेले. निखिल हल्लेखोरांच्या हाती लागला. हल्लेखोरांनी निखीलच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला खाली पाडले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून फरार झाले. वस्तीतील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी निखिलला तपासून मृत घोषित केले.निखीलच्या हत्येमुळे वस्तीत तणाव पसरलेला आहे. १९ मे रोजी घडलेल्या घटनेत पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे आरोपींनी निखीलचा खून करण्याचे धाडस केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.मुलांनीही केले वारहल्ल्यात आरोपींचे संपूर्ण कुटुंब सहभागी होते. कुटुंबाचा प्रमुख शंकर सोलंकी, देवा सोलंकी, प्रवीण सोलंकी, सूरज राठोड, रमेश सोलंकी, इशु सोलंकी आणि परिवारातील महिला व मुलांसह २० ते २२ लोक सहभागी होते. सर्वांचाच हाती धारदार शस्त्र व इतर शस्त्र होते. ज्या पद्धतीने हल्ला करून खून करण्यात आला, त्यावरून वस्तीत कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. हल्लेखोरांनी त्यांच्या मार्गात येणाऱ्या कुणालाही सोडले नाही. शांतिनगर पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगा, आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून १९ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर