शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जीआरच्या अटींनी वाढवले टेन्शन : नवीन कामेच करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:02 IST

आर्थिक तंगीत असलेल्या नागपूर मनपाला राज्य सरकारतर्फे १५० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. संबंधित अनुदानाचा जीआरसुद्धा चार दिवसांपूर्वीच जारी करण्यात आला आहे. परंतु जीआरमधील अटींनी नागपूर मनपाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. दिवाळी जवळ आल्याने मनपा प्रशासनाला घाम फुटू लागला आहे. सत्तापक्षावर टीकाही होऊ लागल्या आहेत. आता जीआरमधील अटींना शिथील करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यांना कितपत यश येते आणि बकायदारांचे बिले क्लियर होतात की नाही, ते पाहावे लागेल.

ठळक मुद्देराज्य सरकारकडून मनपाला १५० कोटींचे विशेष अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक तंगीत असलेल्या नागपूर मनपाला राज्य सरकारतर्फे १५० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. संबंधित अनुदानाचा जीआरसुद्धा चार दिवसांपूर्वीच जारी करण्यात आला आहे. परंतु जीआरमधील अटींनी नागपूर मनपाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. दिवाळी जवळ आल्याने मनपा प्रशासनाला घाम फुटू लागला आहे. सत्तापक्षावर टीकाही होऊ लागल्या आहेत. आता जीआरमधील अटींना शिथील करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यांना कितपत यश येते आणि बकायदारांचे बिले क्लियर होतात की नाही, ते पाहावे लागेल.३०० कोटी रुपयांच्या थकीत बिलाबाबत गेल्या दोन आठवड्यांपासून ठेकेदार संघर्ष करीत आहेत. शहरात विकास कामे ठप्प पडली आहेत. बस आॅपरेटर्सचेही थकीत पुन्हा वाढून ६० कोटीवर पोहोचले आहे. वेतन एरियर्ससाठी कर्मचारी, शिक्षक आंदोलनाचा इशारा देत आहेत. कंत्राटदार कर्मचाऱ्यांकडे कुणाचेच लक्ष नाही. वित्तीय नियोजन नसल्याने हे सर्व घडत आहे. वित्त विभागाचे प्रमुखपद गेल्या ११ महिन्यांपासून रिक्त आहे. जीआरनुसार १२ डिसेंबर २०१७ ची अट लागू करण्यात आली आहे. यानुसार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्य अभियंताच्या अध्यक्षतेखाली विकास कामांची फाईल मंजूर होईल. त्यांचे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे येईल. नंतर त्याला मंजुरी मिळेल. जीआरमध्ये संबंधित निधीला वर्ष २०१८-१९ च्या कामांवर खर्च करण्याचा उल्लेख आहे. परंतु मनपा प्रशासन व सत्तापक्षाला २०१७-१८ मध्ये केलेल्या कामांचे थकीत देण्यासाठी या निधीचा उपयोग करायचा आहे. त्यामुळे याबाबत सत्तापक्षाला अधिक सक्रिय व्हावे लागेल. तेव्हाच दिवाळीपूर्वी निधी उपलब्ध होऊ शकेल.मुख्यमंत्री-गडकरींना रनवेवर सांगितल्या जीआरमधील त्रुटीहिंगणघाटमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. कार्यक्रम आटोपून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरले. तेथून ते विमानाने थेट रवाना होणार होते. याची माहिती मिळताच मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आणि सत्तापक्ष नेते संदीप जोशी विमानतळावर पोहोचले. तेव्हा त्यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी थेट विमानाने रवाना होणार असल्याची माहिती मिळाली. कुकरेजा आणि जोशी हे विमानतळ प्रशासनाची परवानगी घेऊन हेलिकॉप्टरपर्यंत गेले. तिथे रनवेवरच त्यांनी जीआरमधील अटींमुळे होत असलेल्या अडचणींची माहिती दिली. कुकरेजा यांनीही याची पुष्टी करीत सांगितले की, रनवेवरच चर्चा झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सुधारित जीआर काढून लवकरच अनुदान मंजूर केले जाईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी