शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सोनेरी हेराफेरीने नागपुरातील तहसील ठाण्यात वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:03 IST

तहसील पोलीस ठाण्यात घडलेल्या सोनेरी हेराफेरीच्या प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार, परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर या प्रकरणाची चौकशी करीत असून, त्यांनी या संबंधाने ‘कक्कड मामा’सह अनेकांकडे विचारपूस चालविली आहे. त्यामुळे तहसील पोलीस ठाण्यात वादळ आल्यासारखी स्थिती आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी घेतली गंभीर दखलउपायुक्तांकडून चौकशीसीसीटीव्हीतून शोधणार तथ्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तहसील पोलीस ठाण्यात घडलेल्या सोनेरी हेराफेरीच्या प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार, परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर या प्रकरणाची चौकशी करीत असून, त्यांनी या संबंधाने ‘कक्कड मामा’सह अनेकांकडे विचारपूस चालविली आहे. त्यामुळे तहसील पोलीस ठाण्यात वादळ आल्यासारखी स्थिती आहे.३ जानेवारीला हे प्रकरण घडल्याची चर्चा आहे. सराफा व्यापाऱ्याकडून आणलेल्या चार किलो सोने सोडवण्याच्या बदल्यात मांडवली झाली. त्यानुसार, तीन किलो सोने ज्याचे त्याला परत करण्यात आले तर एक किलो सोने पोलिसांनी ठेवून घेतले. तपास अन् चौकशीच्या नावाखाली हा सर्व व्यवहार डीबी रूममध्ये झाला. ७०२२ मधून मागच्या गेटने मामाला आणण्यात आले आणि कारवाईचा धाक दाखवत त्याला मामा बनवून एक किलो सोन्याची मांडवली ‘किशोर’ने घडवून आणल्याची चर्चा आहे. किशोर हा आधीपासूनच वादग्रस्त आहे. त्याचे तहसीलच काय अनेक जुन्या साथीदारांशी पटत नाही. त्यामुळे किशोरचा हा गेम त्याच्या नव्या-जुन्या पाच साथीदारांनी वाजवला. एक किलो सोन्याची हेराफेरी झाल्याचे वृत्त व्हायरल करण्यात आल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली. या प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी लगेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस उपायुक्त माकणीकर यांनी ३ तारखेपासूनच्या पोलीस ठाण्यातील घडामोडींची बारीकसारीक चौकशी चालवली आहे. या प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी कक्कड मामासह अनेकांना विचारपूस झाली आहे. समोर आणि मागच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. त्यामुळे एक दोन दिवसातच या प्रकरणातील तथ्य समोर येण्याची शक्यता पोलीस उपायुक्त माकणीकर यांनी आज पत्रकाराशी बोलताना व्यक्त केली.किशोर महंतची बदली रद्दतहसील पोलीस ठाण्यात कार्यरत किशोर महंतची गुरुवारी करण्यात आलेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली. तहसील ठाण्यातून त्याची गुन्हे शाखेतील अंमली पदार्थविरोधी पथकात बदली करण्यात आली होती. मात्र, पोलीस ठाण्यातील प्रकरण वादग्रस्त ठरल्याने अनेक अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. त्यामुळे महंतच्या बदलीचा गुरुवारी काढण्यात आलेला आदेश शुक्रवारी तडकाफडकी रद्द करण्यात आला. त्याच्यासोबत अन्य दोन कर्मचाऱ्यांच्या बदलीचेही आदेश रद्द करण्यात आले. सोनेरी हेराफेरी आणि चौकशीसोबतच रद्दबातल झालेली बदली यामुळे तहसील ठाण्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीPolice Stationपोलीस ठाणे