शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मैत्रिणीमुळे भाजपा पदाधिकारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:00 IST

महिला मैत्रीण आणि पत्नीत जोरदार वाद झाल्याने भाजपाच्या शहर कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका पदाधिकाऱ्याची चांगलीच गोची झाली आहे. महिला मैत्रीण आणि पत्नीतील वाद बाचाबाचीवरून हाणामारीवर गेल्याने प्रकरण जरीपटका ठाण्यात पोहोचले. पदाधिकाऱ्याच्या हितचिंतकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याने या प्रकरणात तक्रार दाखल करण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देबाचाबाचीवरून हाणामारी : दोन्हीकडून पाणउतारा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला मैत्रीण आणि पत्नीत जोरदार वाद झाल्याने भाजपाच्या शहर कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका पदाधिकाऱ्याची चांगलीच गोची झाली आहे. महिला मैत्रीण आणि पत्नीतील वाद बाचाबाचीवरून हाणामारीवर गेल्याने प्रकरण जरीपटका ठाण्यात पोहोचले. पदाधिकाऱ्याच्या हितचिंतकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याने या प्रकरणात तक्रार दाखल करण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.शहर कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर असलेले हे पदाधिकारी जरीपटक्यात राहतात. शुक्रवारी त्यांच्याकडे त्यांची महिला मैत्रीण पोहोचली. तिला पाहून पत्नीचा पारा चढला. पत्नीने तिचा पाणउतारा केल्याने महिला मैत्रिणीनेही त्याच भाषेत उत्तर दिले. घरातून काढण्यासाठी आणि न निघण्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आल्याने बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे समजते. हे कळताच भाजपात महत्त्वाची भूमिका वठविणारी मंडळी धावली. त्यांनीही दोघींत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघीही इरेला पेटल्याने वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथेही अनेक हितचिंतक पोहोचले. त्यांनी दोघींनाही समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघी एकमेकींचा तेथेही पाणउतारा करीत राहिल्या. सायंकाळी शहरात भाऊबिजेची तयारी सुरू असताना जरीपटका ठाण्यात नगरसेवकांसह अनेक हितचिंतक दोन्ही जणींना ‘ताई घरी चला, तेथे काय ते बघू’, असे म्हणत दोघींची मनधरणी करीत होते. ठाण्याबाहेर गर्दी वाढल्याने पोलिसांवरही प्रचंड दडपण आले. दरम्यान,दोघींनीही आपापले गाऱ्हाणे तक्रारीच्या रूपाने पोलीस ठाण्यात मांडले. परिणामी पोलिसांनी या दोघींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. गुन्हा दाखल करण्याची जवळपास तयारी झाली. त्यामुळे हादरलेल्या हितचिंतकांनी या दोघींना त्याच्या गंभीर परिणामाची जाणीव करून दिली. एकदा गुन्हा दाखल झाल्यास काय होऊ शकते, हे समजावून सांगण्यात हितचिंतक यशस्वी ठरले. त्यामुळे या प्रकरणात जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे टळले.दरम्यान, या प्रकरणाचे वृत्त शुक्रवारी रात्रीपासून शहरात कर्णोपकर्णी पसरल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली. भाजपा पदाधिकारी मैत्रिणीमुळे कसे अडचणीत आले, त्याची चर्चा आज दिवसभर शहरातील राजकीय वर्तुळात होती. दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणात बोलण्याचे टाळले. कशाला अडचणीत यायचे, अशी भूमिका घेत पोलिसांनी चुप्पी साधली. घटना खरी असली तरी गुन्हा दाखल नसल्याने काहीही बोलायचे नाही, असे पोलीस म्हणत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण