शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीने लग्न केल्यामुळे शिक्षा कमी होऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 22:33 IST

घटनेच्या वेळी आरोपी केवळ १९ वर्षांचा होता. त्यानंतर बराच मोठा काळ निघून गेला आहे. आरोपीने आता लग्न केले आहे. त्यामुळे शिक्षा कमी करण्यात यावी, अशी विनंती आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने या कारणांवरून आरोपीची शिक्षा कमी केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले व शिक्षा कायम ठेवून आरोपीला दणका दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणका : पाच वर्षांचा कारावास कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घटनेच्या वेळी आरोपी केवळ १९ वर्षांचा होता. त्यानंतर बराच मोठा काळ निघून गेला आहे. आरोपीने आता लग्न केले आहे. त्यामुळे शिक्षा कमी करण्यात यावी, अशी विनंती आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने या कारणांवरून आरोपीची शिक्षा कमी केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले व शिक्षा कायम ठेवून आरोपीला दणका दिला.आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केल्यामुळे फिर्यादीला नाजूक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या होत्या. त्या जखमा फिर्यादीचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरू शकत होत्या. फिर्यादी देवाच्या कृपेमुळे वाचला, असे निरीक्षणही न्यायालयाने निर्णयाच्या समर्थनार्थ नोंदविले. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.मो. अकील मो. आजम (३७) असे आरोपीचे नाव असून, तो शांतिनगर येथील रहिवासी आहे. महेंद्र गुप्ता असे जखमीचे नाव आहे. गुप्ता यांचे किराणा दुकान होते. त्यांच्याकडे शंकर नामक व्यक्ती भाड्याने राहात होती. शंकर कपडे प्रेस करण्याचे दुकान चालवीत होता. २ आॅक्टोबर २००० रोजी मो. अकील व इतर आरोपी पैशाच्या वादातून शंकरला मारहाण करीत होते. गुप्ता यांनी भांडण शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मो. अकीलने त्यांच्या पाठीत व पोटात गुप्ती भोसकली.६ जुलै २००४ रोजी सत्र न्यायालयाने या आरोपीला भादंविच्या कलम ३०७(खुनाचा प्रयत्न)अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे भूमिका स्पष्ट करून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला व आरोपीचे अपील फे टाळून लावले. आरोपी जामिनावर बाहेर असून त्याने आत्मसमर्पण करावे किंवा सत्र न्यायालयाने आरोपीला कारागृहात धाडण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर