शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

आगीच्या घटनेने तीन दिवस औषधांचा बाजार बंद : औषधांच्या तुटवड्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:38 IST

गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ‘नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवार व शनिवार औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारी औषध बाजार सुरू होणार आहे. सलग तीन दिवस बाजार बंद राहणार असल्याने औषधांच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटनेमुळे असोसिएशनने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ‘नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवार व शनिवार औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारी औषध बाजार सुरू होणार आहे. सलग तीन दिवस बाजार बंद राहणार असल्याने औषधांच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरासोबतच संपूर्ण विदर्भाला औषधांचा पुरवठा करणारे नागपुरात ३०० हून अधिक ठोक विक्रेते आहेत. गांधीबाग येथे सुमारे १५० तर संदेश औषध बाजारातही एवढीच ठोक विक्रेत्यांची दुकाने आहेत. गुरुवारी रात्री संदेश औषध बाजाराला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. दुसऱ्या दिवशी, आग धुमसत असल्याने ‘नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवार व शनिवारी गांधीबाग औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हे ठोक विक्रेते नेहमीच्या औषधांसोबतच अवयव प्रत्यारोपण, कॅन्सर, हृदयविकारासारख्या, गंभीर व इमर्जन्सीमध्ये लागणारी औषधे उपलब्ध करून देतात. परंतु आता बाजारच बंद असल्याने याचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अनेकांना औषधांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली होती.औषधांचा तुटवडा पडू देणार नाही-नावंदरमहाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आगीत जळालेल्या दुकानांच्या व्यावसायिकांशी चर्चा केली. असोसिएशन तुमच्या पाठिशी असल्याचा धीरही दिला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, तीन दिवस औषधांचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार बंद राहणार असलातरी औषधांचा तुटवडा पडू देणार नाही. असोसिएशनचे पदाधिकारी यासाठी कार्यरत राहतील, अशी ग्वाहीही दिली.दुकानांमध्ये दहा दिवसांचा साठाकिरकोळ औषध दुकानांमध्ये साधारण १०-१२ दिवसांचा औषधांचा साठा असतो. शिवाय, धंतोली, रामदासपेठ आदी ठिकाणच्या मोठ्या औषधांच्या दुकानांत सर्वच प्रकारची औषधे उपलब्ध असतात. यामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांवर कठीण प्रसंग येणार नाही. सोमवारपासून गांधीबाग औषध बाजार उघडण्याची शक्यता आहे.हरीश गणेशानीसदस्य, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना

 

टॅग्स :medicineऔषधंfireआग