शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कार्यक्रमप्रसंगी झाला गोंधळ; महेंद्रसिंग धोनी निघून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 15:13 IST

एम.एस. धोनी अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे नाराज होऊन क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी कार्यक्रम अर्धवट सोडून निघून जाण्याची घटना नागपुरात बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदोन तास करणार होता मार्गदर्शनबाऊन्सर्सच्या धक्क्यामुळे स्वागताला आलेली लहान मुले खाली पडली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एम.एस. धोनी अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे नाराज होऊन क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी कार्यक्रम अर्धवट सोडून निघून जाण्याची घटना नागपुरात बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. नागपूरजवळच्या डोंगरगाव येथे गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी धोनी विदर्भातील १२५ क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होता. सकाळी धोनीचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच पालक आणि कार्यकर्त्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गोंधळ घातला. याबाबत धोनीने आयोजकांकडे नाराजीही व्यक्त केली. या गोंधळाला दूर करीत कसाबसा धोनी व्यासपीठावर पोहचला. कार्यक्रमाला सुरुवातही झाली. दरम्यान धोनीच्या स्वागताला फुले घेऊन उभी असलेल्या लहान लहान शाळकरी मुलांना तेथील बाऊन्सर्सचा धक्का लागून ती खाली पडली. त्यामुळे पालक संतापले. हा प्रकार कळताच आधीच नाराज झालेल्या धोनीने अधिक व्यथित होऊन कार्यक्रमस्थळच सोडले. कार्यक्रमासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना नंतर स्थानिक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. मात्र धोनीचे मार्गदर्शन न मिळाल्याने विद्यार्थी व त्यांचे पालकही नाराजी व्यक्त करीत होते.बाऊन्सर्सनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही दोनदा रोखलेया बाऊन्सर्सनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही दोनदा अडवले. यावर या प्रतिनिधींनी आयोजकांकडे आपली नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :M. S. Dhoniएम. एस. धोनी