शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटींच्या थकबाकीमुळे नागपुरातील शहर बस सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:29 IST

नागपूर महापालिका प्रशासनाने ५० कोटींची थकीत रक्कम न दिल्याने रेड बस आॅपरेटरने शनिवारी अचानक संप पुकारल्याने शहर बस सेवा ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देबस आॅपरेटरची थकबाकीडिझेल व वेतनासाठी पैसे नसल्याने अचानक संप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेने गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ग्रन बस सेवा थकबाकीमुळे महिना भरापूर्वी बंद पडली. त्याच वेळी रेड बसच्या आॅपरेटरने ५० कोटींची थकीत न मिळाल्यास शहर बस सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने याची दखल न घेतल्याने रेड बस आॅपरेटरने शनिवारी अचानक संप पुकारल्याने शहर बस सेवा ठप्प झाली आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.शहरात ३२० बसेस धावतात. यातून दररोज १ लाख ६५ हजार प्रवासी प्रवास करतात. शहर बस बंद असल्याचा फायदा घेत आॅटो चालक मनमानी भाडे वसूल करून प्रवाशांना वेठिस धरत आहेत. तसेच टॅक्सीसाठी जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. रेड बस आॅपरेटर, ग्रीन बस आॅपरेटर व डिम्ट्स यांचे परिवहन विभागाकडे ५० कोटी थकीत आहे. मागील सहा महिन्यापासून आॅपरेटरला बील मिळालेले नाही. त्यामुळे डिझेलसाठी पैसे नसल्याने आॅपरेटरने बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.आॅगस्ट महिन्यात काही रक्कम आॅपरेटला देण्यात आली होती. उर्वरित रक्कम तातडीने देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही बीलाची रक्कम न मिळाल्याने आॅपरेटने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.

तिकीटाचा पैसा अन्यत्र वळविलाबस तिकीटाच्या माध्यमातून दर महिन्याला महापालिकेच्या तिजोरीत ६ कोटींचा महसूल जमा होतो. किमान ही रक्कम परिवहन विभागाच्या खात्यात वळती केली असती आॅपरेटरची अर्धी थकबाकी देता आली असती. नियोजनचा अभाव असल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका