शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक प्रकारात अडसर ठरल्यानेच हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 01:29 IST

अनैतिक प्रकारांना प्रखर विरोध करून पत्नी-मुलीकडे शिस्तबद्ध जीवनाचा आग्रह धरल्यामुळेच नरेंद्रनगर येथील प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांना त्यांचा जीव गमवावा लागला.

ठळक मुद्देशिस्तीमुळे गमावला प्राचार्य वानखेडेंनी जीव : आरोपींना कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनैतिक प्रकारांना प्रखर विरोध करून पत्नी-मुलीकडे शिस्तबद्ध जीवनाचा आग्रह धरल्यामुळेच नरेंद्रनगर येथील प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांना त्यांचा जीव गमवावा लागला. पहिल्या प्रयत्नात आरोपींना त्यांची हत्या करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आरोपींनी आधी रचलेल्या कटकारस्थानात बदल करून अखेर शुक्रवारी, ३ नोव्हेंबरला त्यांचा बळी घेतला. दरम्यान, अटकेतील आरोपींना रविवारी कोर्टाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.प्रा. वानखेडे शिस्तप्रियहोते. आपल्या परिवारातील सदस्यांनीही शिस्तीतच राहावे, असा त्यांचा आग्रह होता. पत्नीचे, नवरा सोडून घरी येऊन बसलेल्या मुलीचा बाहेरख्यालीपणा त्यांना आवडत नव्हता. त्यावरून त्यांच्या घरात रोजच कटकटी होत होत्या. पहाटे उठून आपल्या कर्तव्यावर गेल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत प्रा. वानखेडे आपल्या जबाबदारीचे नियोजन करायचे. सुटीच्या दिवशी ते घरी राहायचे. मुलीचे वर्तन त्यांना अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे प्रसंगी ते हातदेखील उगारत होते. दुसरीकडे पत्नी अनिता आणि मुलगी सायली प्रा. वानखेडेंसोबत शत्रूसारखे वर्तन करायच्या. त्यामुळे घरातल्या घरात आदळआपट, मारहाणीची घटना घडत होती. मोकळेपणाने जगता येत नसल्यामुळे या दोघी त्यांना धमकावतदेखील होत्या. जगायचे असेल तर बºया बोलाने राहा, असे त्या नेहमी प्रा. वानखेडेंना बजावून सांगायच्या. मात्र, त्या या टोकाला जातील अशी कल्पनादेखील प्रा. वानखेडेंना नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या धमकावण्यांकडे दुर्लक्ष करायचे. ते बधत नसल्यामुळे त्यांचा कायमचा काटा काढण्याची योजना सायलीने तिच्या आईला एक महिन्यापूर्वी सांगितली. बाहेरख्याली मुलीचे कान उपटण्याऐवजी शिक्षिका असलेल्या अनिताने तिच्या कटकारस्थानात सहभागी होऊन स्वत:च स्वत:चे कुंकू पुसण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सायलीच्या मित्राला जवळ करून वानखेडेंना संपवण्यासाठी पाच लाखात सुपारी पक्की केली. मारेकºयांना आठ दिवसांपूर्वी अ‍ॅडव्हान्सदेखील दिला. त्यानंतर सायली व तिचा मित्र शुभम ऊर्फ बंटी मोहुर्ले (२२, रा. हिंगणा नीलडोह), अंकित रामलाल काटेवार (१९) आणि शशिकांत ऊर्फ सोनू चंद्रकांत चौधरी (१९) तसेच अंकुश नामक आरोपींना हाताशी धरून शुभमने प्रा. वानखेडेंचा गेम करण्याची तयारी सुरू केली.पहिला वार हुकलाआरोपींनी सोमवारी ३० आॅक्टोबरला प्रा. वानखेडेंची हत्या करण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयात जाण्यासाठी प्रा. वानखेडे रहाटे चौकातून रेल्वेस्थानकाकडे निघाल्यानंतर आरोपींनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली. मात्र, त्याचवेळी समोरून आणि मागून वाहनधारक येत असल्याचे पाहून आरोपी पळून गेले तर, पायाला जुजबी दुखापत झाल्याने वानखेडेंनाही हत्येच्या प्रयत्नाची कल्पना आली नाही. त्यांनी आपली दिनचर्या तशीच ठेवली. यानंतर शुभमला आपले साथीदार कचखाऊ असल्याचे लक्षात आल्याने त्याने सागर ऊर्फ पाजी बावरी (२०) याला सुपारीत सहभागी करून घेतले. नंतर सर्वांनी पुन्हा तयारी करून शुक्रवारी पहाटे प्रा. वानखेडेंची निर्घृण हत्या केली. एका दुचाकीवरील अंकुश बडगे आणि साथीदाराने प्रा. वानखेडेंना नीरीच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार धडक मारून खाली पाडले आणि दुसºया दुचाकीवरील पाजी आणि त्याच्या साथीदारांनी तलवारीचे घाव घालून हत्या केली. सायलीच्या मोबाईलच्या सीडीआरने या हत्याकांडाचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका वठविली. हत्येच्या घटनेनंतर सायली तिचा मित्र शुभमला आणि तो सायलीला वारंवार फोन करीत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आरोपी शुभमच्या मुसक्या बांधल्या. त्याने दिलेल्या माहितीनंतर अंकित, शशिकांत आणि सागर ऊर्फ पाजीसह सुपारी देणाºया अनिता तसेच सायलीलाही अटक केली. त्यांना रविवारी कोर्टात हजर करून त्यांचा ९ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. फरार अंकुशचा शोध घेतला जात आहे.आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताया हत्याकांडात आणखीही काही आरोपी गजाआड होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी रविवारी सायंकाळी त्या संबंधाने अनिताशी मैत्री जपणाºया काहींची चौकशी चालवली होती. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या या खळबळजनक हत्याकांडाचा तपास बजाजनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर पाटील, वैजयंती मांडवधरे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.