शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नागपुरात अस्ताव्यस्त खोदकामामुळे रस्त्याचे अस्तित्वच संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:42 IST

वर्धमाननगर ते पारडीपर्यंत कधीकाळी प्रशस्त असलेल्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अमर्याद आणि अस्ताव्यस्त खोदकामामुळे या रस्त्याचे अस्तित्वच संकटात सापडले असून या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.

ठळक मुद्देवर्धमाननगर ते पारडी मार्गाची दैना : महामेट्रो, एनएचएआयच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धमाननगर ते पारडीपर्यंत कधीकाळी प्रशस्त असलेल्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अमर्याद आणि अस्ताव्यस्त खोदकामामुळे या रस्त्याचे अस्तित्वच संकटात सापडले असून या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. या अवस्थेला महामेट्रो आणि पारडी उड्डाण पुलाचे काम करणारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काम सुरू असल्याने एका बाजूचा मार्ग बंद करण्यात आला आहे आणि ज्या मार्गाने वाहतूक सुरू आहे, त्या भागात मेट्रोच्या पिलरसाठी खोदकाम करण्यात आले आहे. पूर्वी २४ ते ३० मीटर रुंद असलेल्या या मार्गावरून आज एक ट्रक निघणे कठीण झाले आहे.या मार्गावरील सर्वाधिक वाईट अवस्था प्रजापतीनगर चौक, रेल्वे क्रॉसिंग होत एचबी टाऊन आणि पारडी चौकादरम्यान आहे. वर्धमाननगर ते वैष्णोदेवी चौक पर्यंत काही भाग दुरुस्त करण्यात आला असला तरी वैष्णोदेवी चौक ते पारडीपर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या चौकातून निघताच वाहन चालकांचा खड्ड््यांशी सामना होतो. पारडी चौकापर्यंत जवळपास ६० ते ७० मोठे खड्डे पडले आहेत. ९० टक्के मार्ग उखडलेला आहे. राधाकृ ष्ण हॉस्पिटल चौक ते होंडा शोरूमच्या भागात वाहतूक सुरू आहे. जड वाहनांसाठी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. शोरूमसमोर केवळ १२ ते १५ फुटाचा रस्ता केवळ वाहतुकीसाठी शिल्लक आहेत. अशा अवस्थेमुळे या मार्गावर दररोज एक ना एक अपघात ठरलेलाच असतो. अरुंद मार्ग आणि त्यात मोठमोठे खड्डे यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो आहे.आणखी समस्या म्हणजे वाठोडा येथून एक मार्ग रेल्वे क्रॉसिंग होत समोर येतो. पूर्वी रेल्वे क्रॉसिंगपासून ये-जा करण्यासाठी दोन्हीकडून मार्ग होता. मात्र पिलरच्या खोदकामामुळे एक बाजू पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि दुसºया भागात उड्डाण पुलाच्या पिलरसाठी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे येथे केवळ २० फुटाचा रोड शिल्लक राहिला आहे. रिंग रोड असल्याने या मार्गावर सातत्याने जड वाहनांची वाहतूक सुरू असते. रेल्वे क्रॉसिंग ते पारडी चौकापर्यंत रस्त्याचे अस्तित्वच संपल्यागत झाले आहे.कधी तरी हा मार्ग १२० फूट रुंद होता, मात्र आता खड्डे पडलेल्या २० फुटाच्या रोडवरून वाहतूक सुरू आहे. रात्रीच्या वेळी येथे अंधार पडलेला असतो आणि जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. अनेकदा वाहने एकमेकांना धडक देत असतात. थोडेजरी लक्ष विचलित झाले तर अपघात होण्याची शक्यता असते. पारडी चौकात मेट्रो रेल्वेच्या पिलरसह उड्डाणपुलाचे पिलरही लावण्यात येत आहेत. पारडी उड्डाणपुलाचे काम अतिशय कासवगतीने सुरू असून, निर्धारित कालावधी संपला तरी ३५ टक्के काम झाले नाही. मेट्रो रेल्वेचे कामही अनियमितपणे सुरू असून कंत्राटदारांद्वारे सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केले जात आहे.आयुक्त मुंढे यांनी द्यावे लक्षमहापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या मार्गाची पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांद्वारे केली जात आहे. आयुक्तांनी नागरिकांच्या अडचणी जाणून त्या दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मेट्रो रेल्वे आणि एनएचएआयचे काम वेळेत पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रस्त्याचे अस्तित्व संकटात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मार्ग बदलावे लागत आहेत. मात्र मुख्य मार्ग असल्याने अनेकांसाठी दुसरा पर्याय स्वीकारणे शक्य नाही.सिमेंट भरलेला ट्रक उलटलाएचबी टाऊन चौक परिसरातील रस्ता प्रचंड असमतोल असल्याने वाहन चालविणे अत्यंत जिकिरीचे काम झाले आहे. ज्यांना नियमित जावे लागते त्यांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. नवीन व्यक्तींसाठी हा मार्ग मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखाच आहे. तीन दिवसांपूर्वी सिमेंटने भरलेला एक ट्रक या चौकातच उलटला होता. त्याला उचलण्याची तसदीही कुणी घेतली नाही. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला होता. सोमवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान अपघातग्रस्त ट्रकमधून सिमेंट काढण्याचे काम काही मजूर करताना दिसून आले. येथील सिमेंट दुसऱ्या ट्रकवर लादण्यात येत होते.न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपलीशहरातील खड्ड्यावरून उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिले आहेत. निर्धारित काळात मार्गाचे खड्डे बुजवून रस्ता समतल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात मोहिमही राबविण्यात आली, मात्र या मार्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले. डांबराच्या रस्त्यावर सिमेंटपाणी टाकून थातूरमातूर काम करण्यात आले. यामुळे खड्डे तर बुजले नाही, उलट रस्ता असमतोल झाला. त्यामुळे वाहन पलटण्याची व अपघातांची संख्या वाढली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर