शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात वाहनांचे ‘ड्राय वॉशिंग’; २२ लाख लिटर पाणी वाचवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 10:46 IST

रविवार २१ जुलैपासून विदर्भातील सर्व ऑटोमोबाईल डीलर्सला ग्राहकांच्या वाहनांची धुलाई पाण्याऐवजी ‘ड्राय वॉशिंग’ तंत्रज्ञानाने करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ‘वादा’चे अध्यक्ष आशिष काळे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देरविवारपासून ‘वादा’च्या अभियानास होणार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा विदर्भात निर्माण झालेल्या भीषण जलसंकटाला तोंड देण्यासाठी ‘विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (वादा)’ने वाहनांच्या धुलाईसाठी नव्या तंत्राचा वापर करण्याची तयारी दर्शवली असून, रविवार २१ जुलैपासून विदर्भातील सर्व ऑटोमोबाईल डीलर्सला ग्राहकांच्या वाहनांची धुलाई पाण्याऐवजी ‘ड्राय वॉशिंग’ तंत्रज्ञानाने करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ‘वादा’चे अध्यक्ष आशिष काळे यांनी पत्रपरिषदेत दिली. या अभियानाला देशभरात पसरविण्याची तयारी राष्ट्रीय पातळीवरील असोसिएशनने दर्शवली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.शहरात ऑटोमोबाईल्सचे ५० वर्कशॉप्स असून, या वर्कशॉपमध्ये दरदिवसाला ६०० चारचाकी आणि तीन हजारावर दुचाकींची धुलाई केली जाते. साधारणत: प्रत्येक गाडीच्या धुलाईला १५० ते १६० लिटर पाणी खर्च होत असते. धुलाईसाठी वापरण्यात येणाऱ्या ७० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत असला तरी ३० टक्के पाणी वायाच जाते. संपूर्ण जून महिना पाण्याविना गेला आणि जुलैमध्ये सुद्धा पावसाचे चित्र दिसत नाही. अशा स्थितीत स्थानिक प्रशासनाला हातभार लावण्यासाठी आम्ही या अभियानाची सुरुवात करत असल्याचे काळे म्हणाले. ‘ड्राय वॉशिंग’मध्ये वाहनाच्या धुलाईस केवळ दोन ते तीन लिटर पाण्याचाच वापर होतो.मात्र, यात ३५ टक्के खर्च वाढतो. महिनाभर ग्राहकांकडून हा खर्च वसूल केला जाणार नाही. पाणी टंचाईच्या काळात महिनाभर हा उपक्रम राबविणार असून, त्यानंतर नागरिकांना स्वेच्छेने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.या अभियानातून महिनाभरात शहरातील २२ लाख लिटर पाण्याची बचत केली जाणार असल्याचे आशिष काळे म्हणाले. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन’चाही अध्यक्ष या नात्याने या उपक्रमास देशभरात घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी, ‘वादा’चे सचिव अनुज पांडे, उपाध्यक्ष आंचल गांधी व सहसचिव पंकज मल्होत्रा उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीकपात