शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दारुड्या वाहनचालकांवर कडक कारवाई : पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 21:00 IST

वेळोवेळी समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार दारुड्या वाहनचालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ३० वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आला. तर एकाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली. यानंतर पुन्हा दारूच्या नशेत वाहन चालविताना पोलीस कारवाईत सापडल्यास त्याला त्याचा वाहन चालविण्याचा परवाना नेहमीसाठी रद्द करण्याचे आदेशही न्यायालयाने दिला आहे. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर अंकूश लावण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जाते.

ठळक मुद्देवाहन परवाना सहा महिन्यापर्यंत निलंबित : एकाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेळोवेळी समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार दारुड्या वाहनचालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ३० वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आला. तर एकाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली. यानंतर पुन्हा दारूच्या नशेत वाहन चालविताना पोलीस कारवाईत सापडल्यास त्याला त्याचा वाहन चालविण्याचा परवाना नेहमीसाठी रद्द करण्याचे आदेशही न्यायालयाने दिला आहे. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर अंकूश लावण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जाते.दारूच्या नशेत वाहन चालविल्यास हमखास अपघात होतात. त्यात अनेकदा निष्पाप व्यक्तीचा बळी जातो. अपघातामुळे संबंधितांना अनेकदा जीवघेण्या जखमा होतात. अपंगत्व येते आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास होतो. त्यामुळे दारूच्या नशेत वाहन चालवू नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून दारुड्या वाहनचालकांविरुद्ध ड्रंक न ड्राईव्हची कारवाई केली जाते. त्यात वाहनचालकांकडून जुजबी दंडाची रक्कम वसूल केली जाते. या कारवाईला अनेक वाहनचालक जुमानत नाहीत. कारवाई झाल्यानंतरही ते दारूच्या नशेत वाहन चालवितात. अशा वाहनचालकांची वाहतूक पोलिसांनी आता गंभीर दखल घेतली आहे. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी वारंवार ड्रंक न ड्राईव्हच्या (डीडी) कारवाईत सापडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करता यावी यासाठी या कारवाईचा अहवाल अद्ययावत करून घेतला आहे. त्यानुसार, एकापेक्षा जास्त वेळा डीडीच्या कारवाईत सापडलेल्यांची माहिती तात्काळ वाहतूक शाखेच्या संगणकात उपलब्ध होते. हा अहवाल संबंधित वाहनचालकांच्या विरोधात कोर्ट कारवाईच्या दरम्यान भक्कम पुरावा ठरतो. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांनी सीताबर्डीत दारुड्या वाहनचालकांविरुद्ध डीडीची विशेष मोहीम राबविली. शहरातील सर्व परिमंडळात डीडीच्या कारवाईत वारंवार दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर पुराव्यासह मोटर वाहन न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. त्यासबंधाने निकाल देताना मोटर वाहन न्यायालयाचे न्या. शहजाद परवेज यांनी वेळोवेळी समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार वाहनचालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.३० वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आला. तर, एकाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली. यानंतर पुन्हा दारूच्या नशेत वाहन चालविताना पोलीस कारवाईत सापडल्यास त्याचा वाहन चालविण्याचा परवाना नेहमीसाठी रद्द करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.परिवहन विभागालाही माहितीवारंवार डीडीची कारवाई आणि न्यायालयातून शिक्षा ठोठावूनही दारुडे वाहनचालक जुमानत नसेल तर अशा वाहनचालकाचा वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) नेहमीसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाला कळवावी, असेही या आदेशात न्यायालयाने नमूद केले आहे.सावधान, कारवाईचा धडाका सुरूच : उपायुक्त पंडितदारूच्या नशेत वाहन चालविणे किंवा वारंवार वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २९२८ वाहनचालकांचे परवाने निलंबित करावे, असे प्रस्ताव गेल्या सात महिन्यात वाहतूक पोलिसांनी परिवहन विभागाकडे पाठविले आहे. त्यापैकी १५८ जणांचे परवाने विशिष्ट मुदतीसाठी निलंबित करण्यात आले असून, आणखी अनेक जणांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे कारवाईचा धडाका असाच सुरू राहील,अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हnagpurनागपूर