शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

नागपुरात मद्यपी करताहेत सॅनिटायझरची नशा : पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 20:40 IST

लॉकडाऊनमुळे सर्व बार व वाईन शॉप बंद असल्याने मद्यपींनी नशेकरिता हॅन्ड सॅनिटायझरचा आधार घेतला आहे. ते जीवाची पर्वा न करता सॅनिटायझर पिऊन नशा करीत आहेत.

ठळक मुद्देशांतिनगर पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे सर्व बार व वाईन शॉप बंद असल्याने मद्यपींनी नशेकरिता हॅन्ड सॅनिटायझरचा आधार घेतला आहे. ते जीवाची पर्वा न करता सॅनिटायझर पिऊन नशा करीत आहेत. या प्रकरणात शांतिनगर पोलिसांनी सोमवारी रात्री सॅनिटायझर विक्रेता व चार ग्राहकांना रंगेहात पकडले.आशू हुकूमचंद गुप्ता (३०), रा. शांतिनगर, आकाश मनोज गुप्ता (२८), रा. किल्ला रोड, महाल, सुशील बाबुराव झंझाड (२८), रा. खैरीपुरा, लालगंज, शेख अश्फाक शेख आसिफ (२५), रा. कळमना व अय्याज अली फैयाज अली (३२), रा. शांतिनगर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आशू गुप्ता चहाचे दुकान चालवतो. लॉकडाऊनमुळे त्याचे दुकान बंद आहे. करिता, त्याने कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मद्यपींना दारुच्या नावावर सॅनिटायझर विकण्याची योजना आखली. तो देशी दारू पिणाऱ्यांना सॅनिटायझरमध्ये ७० टक्के अल्कोहोल असल्याची माहिती देत होता. तसेच, सॅनिटायझरचे काहीच दुष्परिणाम नसल्याचे सांगत होता आणि २५० मि.ली. ची सॅनिटायझरची बॉटल २०० रुपयांत विकत होता. त्याचा हा गोरखधंदा काही दिवसांपासून सुरू होता.सोमवारी रात्री शांतिनगर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पटेल कंट्रोलच्या गल्लीत आरोपी आशू संशयास्पद स्थितीत दिसून आला. झडती घेतली असता त्याच्याकडे रॉयल अल्कोहोल हॅन्डरबच्या दोन बॉटल मिळाल्या. अन्य आरोपींनी ते आशूकडे दारु खरेदी करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आशू व अन्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर आशूच्या घराची तपासणी केली असता सॅनिटायझरच्या ४६ बॉटल व दारुची एक बॉटल असा एकूण ४ हजार ३४० रुपयाचा माल मिळाला.शांतिनगरमध्ये देशी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दारुची दुकाने बंद असल्यामुळे मद्यपी नशेकरिता वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. त्यामुळे काहीजण नशेकरिता सॅनिटायझर विकत आहेत. हॅन्ड सॅनिटायझरमध्ये अल्कहोलसह रासायनिक पदार्थ असतात. सॅनिटायझर पिल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो. असे असताना अनेक मद्यपी नशेकरिता हॅन्ड सॅनिटायझर प्राशन करीत आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दारुबंदी कायदा, राष्ट्रीय आपत्ती कायदा व जमाव बंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई डीसीपी राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कवडू उईके, पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, हवालदार वकील, जाधव, देवेंद्र व पंकज यांनी केली.विशेष अभियानाची गरज‘लोकमत’ने रेल्वेलाईनजवळच्या अवैध भट्यांमधून आरोग्यास घातक दारू विकली जात असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. लॉकडाऊनमुळे दारू मिळत नसल्यामुळे मद्यपींची अवस्था वाईट झाली आहे. देशी दारू पिणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मजूर वर्ग आहे. ते नशेकरिता प्राणघातक उपाय करीत आहेत. त्यामुळे प्राणहानीची मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही बाब लक्षात घेता पोलीस व अबकारी विभागाने विशेष मोहीम चालविणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाArrestअटक