शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना औषध पुरवठादारांचा पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 09:44 IST

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना (मेडिकल) औषधे खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कान्ट्रॅक्ट) संपून चार महिन्यांवर कालावधी झाला आहे, तर दुसरीकडे राज्यभरातील औषध पुरवठादारांचे वर्ष होऊनही सुमारे ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. परिणामी, राज्यभरातील मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा पडला आहे. गरीब रुग्ण अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देराज्यभरातील मेडिकलकडे ३५ कोटींची थकबाकी औषधांच्या तुटवड्यामुळे गरीब रुग्ण अडचणीत

सुमेध वाघमारे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना (मेडिकल) औषधे खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कान्ट्रॅक्ट) संपून चार महिन्यांवर कालावधी झाला आहे, तर दुसरीकडे राज्यभरातील औषध पुरवठादारांचे वर्ष होऊनही सुमारे ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी ५ डिसेंबरपर्यंत न मिळाल्यास औषध पुरवठा बंद करण्याचे पत्र राज्यभरातील पुरवठादारांनी एकत्र येऊन वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) दिले आहे. परंतु ‘डीएमईआर’ तातडीने काहीच करायला तयार नसल्याने पुरवठादाराने पुरवठा बंद केला आहे. परिणामी, राज्यभरातील मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा पडला आहे. गरीब रुग्ण अडचणीत सापडले आहेत.आशेचाकिरण म्हणून ज्या मेडिकलकडे पाहिले जाते त्याच मेडिकलमध्ये गेल्या चार महिन्यांपासून औषधांचा ठणठणाट आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या पाचमधून केवळ एक किंवा दोन अनेकवेळा तीही औषधे रुग्णांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अतिदक्षता व आकस्मिक विभागातील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून कमी आणि बाहेरूनच जास्तीतजास्त औषधे आणण्यास पिटाळून लावले जात आहे. असे भीषण चित्र असताना वैद्यकीय शिक्षण विभागाचे ‘आरसी’ ४ आॅगस्टला संपूनही अद्यापही मुदतवाढ किंवा नूतनीकरण केले नाही. विशेष म्हणजे, बहुसंख्य रुग्णालयांकडून ‘आरसी’ नूतनीकरणाचे पत्र व स्मरणपत्रही गेले. ‘लोकमत’नेही महिन्याभरापूर्वी ‘राज्यातील मेडिकल ‘गोरखपूर’च्या मार्गावर या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताला घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी ‘आरसी’ला मुदतवाढ देण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. तर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सचिवांनी तत्काळ मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले होते. परंतु दीड महिन्यावर कालावधी होत असताना ‘आरसी’ची मुदतवाढ किंवा नूतनीकरण झाले नाही. यामुळे सर्वच मेडिकल आता अडचणीत आले आहेत. नागपूरच्या दोन्ही रुग्णालयात तर ३० डिसेंबरपर्यंत औषधांचा साठा असल्याचे बोलले जात आहे.२७ नोव्हेंबर रोजी दिले होते पत्रशासनाने १५ आॅगस्ट २०१७ पासून औषधे खरेदीची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविली. तसे अद्यादेशही काढले. परंतु या कंपनीकडून अद्यापही औषधे खरेदी झालेली नाही. दुसरीकडे या निर्णयाने औषधांची देयके मंजूर होणार नाही या विचारातून पुरवठादाराने २७ नोव्हेंबर रोजी ‘डीएमईआर’ला पत्र देऊन ५ डिसेंबरपर्यंत थकबाकी देण्याची विनंती केली, अन्यथा पुरवठा थांबविण्याचा इशाराही दिला. परंतु थकबाकीच्या संदर्भात ठोस भूमिका कोणीच घेत नसल्याने पुरवठा ठप्प केल्याचे पुरवठादारांचे म्हणणे आहे.

सहानुभूतीचा औषध पुरवठाही बंद करणारएका औषध पुरवठादाराने सांगितले, एकीकडे ‘आरसी’ संपली आहे तर दुसरीकडे ३५ कोटींची थकबाकी आहे. या स्थितीतही काही पुरवठादार गरीब रुग्णांचा विचार करून सहानभूती म्हणून काही औषध पुरवठा करीत आहे. परंतु ‘डीएमईआर’ आमच्या चांगुलपणाचा फायदा घेत असेल तर तेही बंद करू, असे रोखठोक मत मांडले.

‘आरसी’ मुदतवाढीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे‘डीएमईआर’ आरसी मुदतवाढीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांनी याबाबत काही पूरक माहिती मागितली आहे. यामुळे साधारण येत्या सोमवार किंवा मंगळवारी ‘आरसी’ला मुदतवाढ मिळू शकेल. पुरवठादारांचे औषध पुरवठा बंद करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. परंतु त्यांना हिवाळी अधिवेशनापर्यंत पुरवठा सुरू ठेवण्यास सांगितले आहे. त्यांच्या थकबाकीचा निपटाराही लवकरच केला जाईल.-डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

टॅग्स :medicinesऔषधंhospitalहॉस्पिटल