शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग स्मगलर आशी डे अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 23:12 IST

Drug smuggler Aashi De arrested मध्य भारतातील प्रमुख पाच ड्रग स्मगलर्स पैकी एक समजली जाणारी कुख्यात आशी डे हिच्या अखेर शुक्रवारी गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. इंद्रप्रस्थ नगरात एका पॉश सदनिकेतून गेल्या तीन महिन्यापासून ती अमली पदार्थाच्या तस्करीचा गोरखधंदा करीत होती.

ठळक मुद्देपोलिसांनी लावला छडा : पॉश एरियातून चालवत होती नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य भारतातील प्रमुख पाच ड्रग स्मगलर्स पैकी एक समजली जाणारी कुख्यात आशी डे हिच्या अखेर शुक्रवारी गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. इंद्रप्रस्थ नगरात एका पॉश सदनिकेतून गेल्या तीन महिन्यापासून ती अमली पदार्थाच्यातस्करीचा गोरखधंदा करीत होती.

उत्तर नागपुरातून अमली पदार्थाच्यातस्करीत उतरलेली आशी डे गेल्या वर्षभरात एक मोठी ड्रग सप्लायर म्हणून चर्चेला आली होती. ती आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून नागपूर आणि आजूबाजूच्या शहरात एमडी, चरसची तस्करी आणि विक्री करत होती. तिच्या नेटवर्कची माहिती सहा महिन्यांपूर्वी पोलिसांना मिळाली. मात्र, ती हाती लागत नव्हती. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी कुख्यात ड्रग सप्लायर सलमान खान याच्या मुसक्या बांधल्या. सलमान मूळचा उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्याचा रहिवासी होय. मुंबईतील मोठ्या ड्रग पेडलर्ससाठी तो काम करीत होता. नागपुरातही नियमित एमडी आणि चरसची खेप पोहोचवत होता. तो एका पायाने अपंग असल्यामुळे कृत्रिम पाय लावून त्यातून ड्रग तस्करी करायचा. त्यामुळे त्याच्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नव्हते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना सलमान खान नागपुरात नियमित एमडी आणि चरस घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी एनडीपीएस पथकाला सलमानवर नजर ठेवण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सलमान नागपुरात येताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आशी डे भोवती कारवाईचा पाश आवळला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी आशी पोलिसांच्या हाती लागली.

इंद्रप्रस्थ नगरात जमवला अड्डा

आशीने तीन महिन्यापूर्वी इंद्रप्रस्थ नगरातील (भामटी) साई अर्चना रेसिडेन्सीमध्ये आठ हजार रुपये महिन्याने बेंगलोरच्या राव नामक महिलेची सदनिका भाड्याने घेतली होती. येथे ती तिच्या वृद्ध आईसोबत राहू लागली. तिच्या हालचाली प्रचंड संशयास्पद होत्या, असे आता शेजारी सांगत आहेत. पोलीस तिला शनिवारी न्यायालयात हजर करून तिच्या कोठडीची मागणी करणार आहेत.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करीArrestअटक