शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी दिली नाही म्हणून कारचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:14 IST

खंडणी वसुलीसाठी वापरलेल्या कारच्या चालकाला कुख्यात ठगबाज प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा आणि तिच्या साथीदारांना खंडणी दिली नाही म्हणून प्रीतीशी सख्य असलेल्या पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले.

ठळक मुद्देकुख्यात प्रीती दास आणि साथीदारांचे पाप : पुन्हा एक प्रकरण उघड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खंडणी वसुलीसाठी वापरलेल्या कारच्या चालकाला कुख्यात ठगबाज प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा आणि तिच्या साथीदारांना खंडणी दिली नाही म्हणून प्रीतीशी सख्य असलेल्या पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले. एवढेच नव्हे तर जामिनावर आल्यानंतर त्याला कुख्यात गुन्हेगारासारखी वागणूक दिली. प्रशांत जयकुमार असे या पीडिताचे नाव असून त्याने प्रीतीच्या पापात सहभागी असलेल्या पोलिसांची मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.प्रीती सध्या पाचपावली पोलिसांच्या कोठडीत असून तिच्या पापाचे नवनवे किस्से रोज उघड होत आहेत. प्रशांत यांनी आज सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या त्यांच्या तक्रारीनुसार, २२ जुलै २०१९ ला रंजना पराते नामक आरोपी महिलेने तिच्या साथीदारांसह संजय शाहू यांचे अपहरण केले होते. आरोपींनी त्यासाठी प्रशांतची कार भाड्याने घेतली होती. त्या कारमध्ये आरोपी आणि तरुणांचे भांडण सुरू झाल्याने प्रशांतने सर्वांना कारमधून उतरवून दिले आणि तो आपली कार घेऊन घरी निघून गेला. हे प्रकरण पाचपावली पोलिस ठाण्यात तपासाला आले होते. या प्रकरणातील आरोपींना कार भाड्याने दिली म्हणून पोलिसांनी प्रशांतलाही चौकशीसाठी बोलावून घेतले आणि त्याला सहआरोपी म्हणून कारागृहात पाठविले. दरम्यान, कुख्यात प्रीती दास प्रशांतच्या घरी धडकली. तिने प्रशांतची पत्नी सविता यांना २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. सविताने पैसे देण्यास नकार दिला म्हणून तिला मनीष गोडबोले नामक उपनिरीक्षक तसेच अन्य काही पोलिसांनी धमकावल्याचा आरोप प्रशांत आणि त्याच्या पत्नीने तक्रारीत केला आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रशांतला जामीन मिळाला. त्यानंतर प्रीती दास आणि पाचपावली ठाण्यातील मंडळींनी त्याचा व त्याच्या पत्नीचा छळ सुरू केला. कुख्यात गुन्हेगारासारखे ते त्याला वागणूक देऊ लागले. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या नावाखाली त्याला वारंवार ठाण्यात बोलवून कागदावर सह्या करण्यासाठी बाध्य करू लागले. प्रशांत आणि त्याच्या पत्नीने आपली छळ कथा तक्रारीच्या रूपात लिहून ती मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांसह संबंधित वरिष्ठांकडे पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी