शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चैतन्यचे स्वप्न डॉक्टर होऊन आईवर उपचार करण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 10:24 IST

अभ्यासात प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या बळावर त्याने पाहिलेले स्वप्न साकार केलेच. आता चैतन्यचे आणखी एक स्वप्न आहे, आईवर स्वत: उपचार करायचे.

ठळक मुद्देचिकाटीच्या बळावर मिळविले ९५ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नववीत असताना दीर्घ आजाराने वडील गेले. महिनाभरातच आईला अर्धांगवायूचा झटका आला. परिस्थिती फार हलाखीची होती. परंतु तडजोड केली नाही. अभ्यासात प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या बळावर त्याने पाहिलेले स्वप्न साकार केलेच. आता त्याचे आणखी एक स्वप्न आहे, आईवर स्वत: उपचार करायचे. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्र निवडले. केवळ त्याला डॉक्टर व्हायचे नाही तर त्यात संशोधन करायचे आहे.चैतन्य प्रमोद सायरे त्या विद्यार्थ्याचे नाव. पं. बच्छराज व्यास कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी आहे. चैतन्यने बारावीत ९५ टक्के गुण मिळविले आहे. विशेष म्हणजे, भौतिकशास्त्र विषयात त्याने पैकीच्यापैकी गुण घेतले. मानेवाडा रोडलगत भाड्याची छोटीशी खोली म्हणजे चैतन्यचे घर. वडील प्रमोद हे इलेक्ट्रीशियन होते. खासगी व्यवसाय करायचे. मधुमेहामुळे त्यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले, उपचार सुरू असताना चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का चैतन्यची आई करुणा यांना बसला. दीड महिन्यातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आवाज गेला. नीट उभेही राहता येत नव्हते. अशा स्थितीत चैतन्य आणि त्याचा मोठा भाऊ शशांकने तिची शुश्रुषा केली.घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची झाली. शेतकरी असलेल्या काका मदत करीत असला तरी मदत तटपुंजी होती. रडत-कुडत बसण्यापेक्षा चैतन्यने परिस्थितीशी दोन हात करण्याचे ठरविले. यासाठी अभ्यासाचे शस्त्र हाती घेतले. दिवस-रात्र केवळ आणि केवळ अभ्यास केला. यामुळेच त्याला हे यश गाठता आले. ‘लोकमत’शी बोलताना चैतन्य म्हणाला, आजारपणामुळे बाबांचे झालेले निधन आणि अपंग झालेल्या आईमुळेच दहावीपासूनच वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे ठरविले. बारावीचे सत्र सुरू झाले तेव्हा नियमित पाच ते सात तास अभ्यास करायचो. जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा अभ्यासाचे तास वाढविले. मी आणि मोठा भाऊ मिळून आम्ही घरचे सर्व काम करतो. त्यानेही परीक्षेच्या वेळी बरीच मदत केली. आईला चालता-फिरता किंवा बोलता येत नसले तरी तीही काळजी घ्यायची. माझे स्वप्न डॉक्टर व्हायचे असले तरी केवळ उपचारापुरतेच मर्यादित राहायचे नाही तर त्यात संशोधन करायचे आहे, असेही तो म्हणाला.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८