शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची दिवाणी न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:47 IST

गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याचा आरोप असणारे डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी या प्रकरणात तांत्रिक कारणांमुळे खारीज झालेला दावा पुनरुज्जीवित करण्यासाठी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नोटीस बजावून, यावर उत्तर सादर करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे.

ठळक मुद्देवाङ्मय चौर्य प्रकरण : नागपूर विद्यापीठाला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याचा आरोप असणारे डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी या प्रकरणात तांत्रिक कारणांमुळे खारीज झालेला दावा पुनरुज्जीवित करण्यासाठी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नोटीस बजावून, यावर उत्तर सादर करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे.डॉ. मिश्रा सध्या कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठातील विविध प्राधिकरणांवर तब्बल ४० वर्षे कार्य केले आहे. त्यांनी १९६९ मध्ये प्रकाशित आर. व्ही. राव यांच्या पुस्तकांतून उचलेगिरी करून गांधी विचारधारा पदविका अभ्यासक्रमातील शोधप्रबंध तयार केला, असा आरोप तत्कालीन सिनेट सदस्य डॉ. रामभाऊ तुपकरी यांनी केला होता. आरोपाच्या चौकशीकरिता न्यायमूर्ती रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने जुलै-१९९२ मध्ये अहवाल सादर करून मिश्रा यांच्यावर चौर्यकर्माचा ठपका ठेवला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या कार्यकारिणीने १९ आॅक्टोबर १९९२ रोजीच्या बैठकीत अहवाल मंजूर करून, मिश्रा यांच्यावर समितीच्या शिफारशीनुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याविरुद्ध मिश्रा यांनी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. २२ आॅक्टोबर १९९२ रोजी दिवाणी न्यायालयाने या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला होता. त्यामुळे २०१३ पर्यंत मिश्रा यांच्यावर कोणतीच कारवाई करता आली नाही. दरम्यान, न्यायालयाने २२ नोव्हेंबर २०१३ रोजी तांत्रिक कारणामुळे मिश्रा यांचा दावा फेटाळून लावला; परंतु नागपूर विद्यापीठाने त्यावर पुढे काहीच केले नाही. हे प्रकरण आता नव्याने चर्चेत आल्यामुळे व विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे मिश्रा यांनी संबंधित दावा पुनरुज्जीवित करण्यासाठी दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. मिश्रा यांच्यातर्फे अ‍ॅड. घरोटे तर, नागपूर विद्यापीठातर्फे अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयuniversityविद्यापीठ