शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

 डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या बचावासाठी नागरिकांचा सहभाग; आंदोलनाचा दुसरा दिवस  

By सुमेध वाघमार | Updated: November 27, 2023 19:28 IST

मध्य भारतामध्ये काही अंशी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम देणारी एकमेव संस्था म्हणजे नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय आहे.

नागपूर :  इंदोरा, कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इतरत्र पळविण्याच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीने जनआंदोलन सुरू केले असून दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनाला नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. मध्य भारतामध्ये काही अंशी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम देणारी एकमेव संस्था म्हणजे नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय आहे.

 परंतु संपूर्ण विदभार्चा व मध्य भारताचा विचार केल्यास अतिविशेषोपचार सोयी वाढविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवरील तुल्यबळ संस्था निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राच्या श्रेणीवर्धनासाठी अतिविशेषोपचार विभाग व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने ४ मार्च २०१४मध्ये घेतला होता. परंतु त्यानंतरही हे रुग्णालय बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादीत आहे. आता हे रुग्णालयच इतरत्र पळविण्यात येत असल्याने रविवारपासून जनआंदोलन उभारण्यात आले. सोमवारी आ. नितीन राऊत, जेष्ठ विचारवंत उत्तम कांबळे, ओबीसी नेते व माजी आमदार अशोक धवड आणि बसपाचे उत्तम शेवळे यांनी भेट देवून कृती समितीच्या आंदोलनाला समर्थन दिले. सकाळपासून मूलचंद मेहर, शेख शहाबुद्दीन, राजेश कोहाड, दीपा गांवडे आणि विणा दरवाडे यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. संजय दुबे, छाया खोब्रागडे, वेदप्रकाश आर्य, बंडोपंत टेम्भूर्णे, दिनेश अंडरसहारे, संघपाल उपरे आणि उमेश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

टॅग्स :nagpurनागपूर