शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टाईपरायटरची दुरुस्ती थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:17 IST

संविधानाची प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या टाईपरायटरवर लिहिली, त्या टाईपरायटवर केमिकल ट्रीटमेंटचे काम मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे लावण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यामुळे थांबले आहे. बाबासाहेबांनी टाईपरायटरवर लिहिलेले संविधान राष्ट्राला अर्पण केल्यानंतर प्रजासत्ताक राष्ट्राची घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्देएनआरएलसीकडून साहित्यांवर केमिकल ट्रीटमेंट : एक महिन्यापासून काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानाची प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या टाईपरायटरवर लिहिली, त्या टाईपरायटवर केमिकल ट्रीटमेंटचे काम मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे लावण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यामुळे थांबले आहे. बाबासाहेबांनी टाईपरायटरवर लिहिलेले संविधान राष्ट्राला अर्पण केल्यानंतर प्रजासत्ताक राष्ट्राची घोषणा करण्यात आली.हे टाईपरायटर चिचोली येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. संग्रहालयातील टाईपरायटर खराब झाले आहे. येथील वस्तूंना नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी व संरक्षणासाठी कमिटीचे सचिव संजय पाटील यांचे प्रयत्न सुरू आहे. २०१३-१४ सरकारने बाबासाहेबांच्या वस्तूंच्या संरक्षणासाठी ४० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. त्याचबरोबर नासुप्रच्या माध्यमातून बाबासाहेबांचे कपडे, पेन, घड्याळ, भांडे व अन्य साहित्यासह टाईपरायटरला केमिकल ट्रीटमेंटचे काम नॅशनल रिसर्च लेबॉरेटरी फॉर कन्झर्व्हेशन गव्हर्नमेंट आॅफ इंडिया (लखनौ) यांना देण्यात आले होते. या ऐतिहासिक वस्तूंच्या ट्रीटमेंटसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिव्हील लाईन येथील मध्यवर्ती संग्रहालयात जागा देण्यात आली आहे. अजब बंगल्यातील दुसऱ्या माळ्यावर कॅमेऱ्याच्या देखरेखीत एनआरएलसीच्या टीमने लॅब बनवून अनेक वस्तूंवर ट्रीटमेंट करून त्यांना संरक्षित केले आहे. दीड महिन्यापूर्वी संविधानाची प्रास्ताविका लिहिणाऱ्या टाईपरायटरचे काम सुरू करण्यात आले होते. संरक्षक सोनटक्के हे संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसरात कॅमेरे लावत आहे. परंतु ट्रीटमेंट लॅबमध्ये कॅमेरे लावण्यास त्यांना नकार मिळाला आहे. एनआरएलसीच्या टीमच्या मते लॅबमध्ये गुप्त पद्धतीने वस्तूंना केमिकल ट्रीटमेंट करण्यात येते. लॅबमध्ये कॅमेरा लावल्यास त्यातील गोपनीयता भंग होऊ शकते. परंतु संग्रहालय प्रशासन स्वत:ची इमारत असल्याने लॅबच्या आतमध्ये कॅमेरे लावण्यावर अडले आहे. त्यामुळे टीमने टाईपरायटरवर केमिकल ट्रीटमेंटचे काम बंद केले आहे. यासंदर्भात टीमने एनआरएलसीचे संचालक जनरल बी.वी. खरबडे यांना सूचना दिली आहे. त्यांनी राज्य संग्रहालयाचे संचालक तेजस गर्ले यांना पत्र देऊन लॅबच्या आतमध्ये कॅमेरे लावण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या दोन विभागातील अधिकारी आपापल्या निर्णयावर ठाम असल्याने, टाईपरायटरची केमिकल ट्रीटमेंट थांबली आहे.गोपनीयता कायम राहीलमध्यवर्ती संग्रहालयाचे संरक्षक विराज सोनटक्के यांच्या मते एनआरएलसीच्या ट्रीटमेंटच्या कामामध्ये आम्ही कुठलीही दखल देत नाही. सरकारी आदेशानंतर संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ११० कॅमेरे लावण्यात येत आहे. लॅबमध्ये या वस्तूंच्या ट्रीटमेंटच्या कामात गोपनीयता भंग होणार नाही, याची लेखी गॅरंटी देण्यास तयार आहोत. काही शंका असल्यास एनआरएलसीच्या टीमने आमच्याशी चर्चा करावी.लॅबच्या आत कॅमेरे लावणे चुकीचेएनआरएलसी (लखनौ) चे डीजी बी.बी. खरबडे यांच्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू देशासाठी ऐतिहासिक वारसा आहे. त्याचबरोबर ट्रीटमेंटची प्रक्रिया गोपनीय ठेवावी लागते. लॅबच्या आतमधील सर्व वस्तूंच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. लॅबच्या बाहेर सीडीपासून दरवाजापर्यंत कॅमेरे लावल्यास आमचा आक्षेप नाही. परंतु कॅमेऱ्याच्या माध्यमातून कामात हस्तक्षेप आम्हाला मंजूर नाही.

टॅग्स :Nagpur Central Museumनागपूर मध्यवर्ती संग्रहालयDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर