शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नागपूरमध्ये मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 06:13 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली.

नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली. कुणी केक कापला, तर कुणी बुद्ध -भीमगीते आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विविध बौद्ध विहारांनी रॅली काढून महामानवास मानवंदना दिली. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौक आणि शांतिवन चिचोली येथे मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता.दीक्षाभूमीवर दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने सकाळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. कामठी येथील सुप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेसही आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला होता. सकाळी भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या. शांतिवन चिचोली येथेही लोकांनी एकत्र येऊन अभिवादन केले.>चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासूनच गर्दीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमी येथे रविवारी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. रात्री बारा वाजताच अनेक अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. १४ तारखेला रात्री उशिरापर्यंत अनुयायी चैत्यभूमीकडे येतच होते. शुभ्र कपडे, निळे उपरणे, फेटे घातलेल्या अुनयायांनी चैत्यभूमीचा परिसर फुलून गेला होता. येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी पालिका प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती. तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेही अभिवादनासाठी येतील, अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त केला होता. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. या वेळी सामुदायिक त्रिशरण बुद्धवंदना करण्यात आली. त्यानंतर राज्यपालांनी पालिकेने लावलेल्या बाबासाहेबांच्या सचित्र प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.