शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

डॉ. आंबेडकर रुग्णालय विकासाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 18, 2016 03:14 IST

कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी होत आहे.

रुग्णसंख्याही घसरली : दहा वर्षांपासून केवळ बाह्यरुग्ण विभागनागपूर : कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी होत आहे. मात्र, प्रत्यक्षात १० वर्षे होऊनही हे रुग्णालय केवळ बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाची रुग्णसंख्या दरवर्षी कमी होऊन सध्या ती ४०० वर आली आहे. या रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्था स्थापन करण्यावर निर्णय ३ मार्च २०१४ रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधीही मंजूर करण्यात आला. पाच वर्षांमध्ये हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार होता. ५६८ खाटांचे हे रुग्णालय होणार होते. रु ग्णालयाकडे सध्या २९ हजार ७९ चौरस मीटरची जागा उपलब्ध आहे. यातील काही जागेवर बांधकाम होणार होते. डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी १०७३ पदे भरण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यात प्राध्यापकांची २१, सहयोगी प्राध्यापकांची २३, सहाय्यक प्राध्यापकांची ३६, वैद्यकीय अधिकार्यांची ११, परिसेविकांची ५०, अधिपरिचारिकांची ३४३ तर वर्ग तीन व चारची पदेही भरली जाणार होती. परंतु गेल्या दोन वर्षात यावर काहीच झालेच नाही. उलट रुग्णालयात मोजकेच उपचार तेही ठाराविक वेळेसाठीच होत असल्याने एकेकाळी ७०० वर असलेला बाह्यरुग्ण विभाग आता केवळ ४०० वर आला आहे. डॉ. आंबेडकर रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र क्ष-किरण, पॅथालॉजी व सोनोग्राफी विभागातून रुग्ण सेवा दिली जात आहे. हे रुग्णालय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिपत्याखाली सुरू आहे. परंतु डॉक्टर, तंत्रज्ञ आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने यातील एक जरी रजेवर गेल्यास रुग्णसेवा प्रभावित होते. (प्रतिनिधी) औषध व सोयींचा तुटवडामेयोच्या देखरेखेखाली हे रुग्णालय सुरू असलेतरी डॉक्टरांची चमू ही आरोग्य विभागाची आहे. मेयोत औषधांचा तुटवडा असल्याने या रुग्णालयासाठी औषधे उपलब्ध करून देणे अडचणीचे जात आहे. रुग्णालयात ईसीजी मशीन नाही.मोजक्याच चाचण्या होतात. एक्स-रेचा तुटवडा राहत असल्याने रुग्णांना मेयोत पाठविले जाते. या रुग्णालयाला घेऊन रोष व्याप्त आहे. जिल्हा रुग्णालय येथे झाल्यास या सर्व अडचणी सुटण्याची शक्यता आहे.