शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

डीपीसी निधी कपातीने विकास रखडणार : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 20:38 IST

‘डीपीसी’(डिस्ट्रीक्ट प्लॅनिंग कमिटी) निधीत महाविकास आघाडीच्या सरकारने २२५ कोटींची कपात केल्याने जिल्ह्यातील विकास रखडणार आहे. राज्याची उपराजधानी असूनदेखील नागपूरवर अन्याय का असा सवाल माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देनागपूरवर अन्याय का ?, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘डीपीसी’(डिस्ट्रीक्ट प्लॅनिंग कमिटी) निधीत महाविकास आघाडीच्या सरकारने २२५ कोटींची कपात केल्याने जिल्ह्यातील विकास रखडणार आहे. राज्याची उपराजधानी असूनदेखील नागपूरवर अन्याय का असा सवाल माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. शासनाने ‘डीपीसी’च्या निधीत १०० कोटींची वाढ करण्याची मागणी करत या कपातीविरोधात भाजपच्या नेत्यांसह सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.नागपूर जिल्ह्याचा विकास होत असताना निधी वाढविण्याची आवश्यकता होती. परंतु महाविकास आघाडीच्या शासनाने ‘डीपीसी’ला २९९ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर केला. यंदा निधीत २२५ कोटींची कपात करण्यात आली आहे. मागील शासनाने ‘डीपीसी’चा निधी कमी केला नाही. परंतु या सरकारने ‘डीपीसी’च्या योजना कायम ठेवून निधी कपात केल्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पालकमंत्री पांदण योजना, नागरी सुविधा, दिव्यांगांच्या योजना, मागासवर्गीयांच्या योजना, आदिवासींच्या योजनांच्या कामांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. नागपूर जिल्ह्यात शासनातील तीन मंत्री आहे. या सर्वांनी १०० कोटी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. निधीत वाढ व्हावी या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आ. अनिल सोले, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, विकास तोतडे, रमेश मानकर, अविनाश खळतकर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री रस्ते योजना, जलयुक्त शिवार, आंतरजातीय विवाह योजनांचे पैसे डीपीसीतून देण्यात येत असल्याने आकडा मोठा झाला. या योजनांवर यंदा डीपीसीतून पैसे देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता सरकारच्या योजना ‘डीपीसी’तून राबविण्यात येतात. ‘डीपीसी’च्या आराखड्यात यांचा समावेश आहे. या योजना ‘डीपीसी’त समावेश नसल्याचे शासनाने जाहीर करावे, असे ते म्हणाले.सरपंचांची लोकांमधून निवड योग्यचसदस्यांमधून सरपंचांची निवड केल्यास अनेक वाद होतात. घोडेबाजार होतो म्हणून तर लोकांमधून थेट निवड करण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस शासनाने आणली होती. आताच्या सरकारने सरपंचांची थेट जनतेतून होणारी निवड रद्द करून सदस्यांमधून निवड करण्याचा निर्णय केला. हा निर्णय रद्द करण्यात आला पाहिजे. सरपंचांची लोकांमधून निवड करणेच योग्य आहे, असे बावनकुळे यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेGovernmentसरकारfundsनिधी