शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जेनेरिक नको, ब्रॅण्डेडच औषध हवे; डॉक्टरने नाकारली औषधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:03 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एक डॉक्टर रुग्णाला ब्रॅण्डेड ऐवजी जेनेरिक औषधे का विकत घेतली, यावरून वाद घातल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील प्रकार व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रकरण आले सामोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधे उपलब्ध व्हावी, यासाठी ऑक्टोबर २०१५ पासून देशभरात केंद्र सरकार पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबवित आहे. वैद्यकीय शिक्षण विभागानेही आपल्या सर्व डॉक्टरांना जेनेरिक औषधेच लिहून देण्याचा सूचना केल्या आहेत, असे असताना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एक डॉक्टर रुग्णाला ब्रॅण्डेड ऐवजी जेनेरिक औषधे का विकत घेतली, यावरून वाद घातल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने शासकीय रुग्णालयामध्ये खळबळ उडाली आहे.वाढत्या महागाईच्या काळात अनेकांना खासगी डॉक्टरांचे शुल्कासह औषधांच्या किमती परडवत नाही, परिणामी गरीब रुग्ण शासकीय रुग्णालयाची वाट धरतात. परंतु येथेही औषधांच्या तुटवड्यामुळे अनेक औषधे बाहेरून घ्यावी लागतात. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या २००२ च्या नियमानुसार डॉक्टरांनी शक्यतो जेनेरिक औषधेच रुग्णांना लिहून देण्याच्या सूचना आहेत. मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी या संदर्भात वेळोवेळी विभाग प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. विभाग प्रमुखांनी आपल्या डॉक्टरांना प्रिस्क्रीप्शन देताना रुग्णालयात उपलब्ध औषधेच, त्यातही जेनेरिक नावच लिहून देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘सीव्हीटीएस’ विभागातील कनिष्ठ डॉक्टर या आदेशाचीच पायमल्ली करीत असल्याचे प्रकरण सामाजिक कार्यकर्ता नीलेश नागोलकर यांनी समोर आणले.प्राप्त माहितीनुसार, रिताबाई कटारे (६०) रा. चंद्रपूर, या महिलेची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिन्याभरापूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली. गेल्या काही महिन्यापासून तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत. सोमवारी त्या आपल्या नातेवाईकांसोबत ‘सीव्हीटीएस’ विभागात आल्या असता डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे ‘ब्रॅण्डेड’ औषधे लिहून दिली. परंतु ती औषधे साडेतीन हजार रुपयांची होत असल्याने व एवढे पैसे नसल्याने त्यांनी जेनेरिक औषधालयातून ११७८ रुपयांचे औषधे खरेदी केली. ती त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना दाखविल्यावर त्यांनी ‘ब्रॅण्डेड’ औषधे खरेदी का केली नाही, असा प्रश्न केला. महागडे व स्वस्त साबणाचे उदाहरणही दिले. रुग्णालयाच्या समोर असलेल्या न्यू संजीवनी व अमृत औषधीच्या दुकानात त्या मिळतात असेही सांगून औषधे परत करण्यास सांगितले. हा व्हिडीओ सोमवारी रात्री व्हायरल झाला. या व्हिडीओला मेडिकल प्रशासनाने गंभीरतेने घेतले आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी प्रकरण तपासणीचे आदेश दिले. मेडिकल प्रशासन या प्रकरणावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जेनेरिक नाकारणे चुकीचेचमेडिकलमध्ये सर्व डॉक्टरांना जेनेरिक औषधेच लिहून देण्याच्या सूचना आहेत. यामुळे रुग्णांनी आणलेली जेनेरिक औषधी नाकारणे चुकीचे आहे. तूर्तास या संदर्भात कुणी तक्रार दाखल केलेली नाही. एका व्हिडीओतून हे प्रकरण समोर आले आहे. यामुळे तपासणीचे आदेश दिले आहे. यात कुणी दोषी आढळून आल्यास नियमानुसार कारवाई होईल.-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :medicinesऔषधं