शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:37 IST

सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई असूनही नागरिकांनी त्रास सहन केला. दोन दिवसाच्या पावसात मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाला. लोकांच्या घरात पाणी शिरले. नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. आयुक्त फोन उचलत नाही. प्रभागातील अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.कोरोनाचे कारण पुढे करून २० जूनला होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याची माहिती सोमवारी निगम सचिवांनी महापौर कार्यालयाला पाठविलेल्या पत्रातून दिली. यामुळे मनपातील सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मागील चार महिन्यात सभागृह झाले नाही. प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. नागरिकांच्या समस्या सोडविता येत नाही. राज्यातील काही महापालिकांच्या सभा झाल्या. मग नागपूर मनपाची सभा का नाही. प्रशासनाला असाच कारभार करावयाचा असेल तर मनपा बरखास्त करून नगरसेवकांना घरी बसवावे, अशा शब्दात नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.प्रशासनाची भूमिका लोकशाहीला घातकमनपाची सर्वसाधारण सभा फेब्रुवारी महिन्यात झाली. गेल्या चार महिन्यात सर्वसाधारण सभा झालेली नाही. प्रभागातील विकास कामे, पावसाळ्यातील उपाययोजना, पुढील वर्षाचा अर्थसंकल्प, अर्धवट कामे मार्गी लागावीत, नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता याव्यात, यासाठी २० जूनला सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. कोरोना संसर्गाचा विचार करता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवण्यासाठी सुरेश भट सभागृहात ही सभा घेतली जाणार आहे. असे असूनही मनपा प्रशासनाची सभा रद्द करण्याची भूमिका लोकशाहीला घातक आहे.संदीप जाधव, सत्तापक्ष नेता, मनपा...तर मनपाच बरखास्त करा!शासन दिशानिर्देशांचे पालन करून मनपाची सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. असे असतानाही मनपा प्रशासनाकडून सभा रद्द होत असेल, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना कोणतीही कामे करता येत नसतील तर मनपाच बरखास्त करा, मनपा आयुक्तांची भूमिका लोकशाहीला घातक आहे.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, मनपानागरिकांच्या समस्या कशा सोडवणार?प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या तक्रारी नगरसेवक प्रशासनाकडे मनपा प्रशासनाकडे मांडतात. परंतु मागील चार महिन्यापासून नगरसेवकांचे फोन उचलले जात नाही. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. दुसरीकडे नागरिकांच्या रोषाला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यात सभागृह रद्द होत असेल तर नगरसेवक तक्रारी कुणाकडे करणार?दुनेश्वर पेठे, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका