शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्त कुटुंबाला बहिष्कृत करू नका! महापौर जोशी यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 20:48 IST

कोरोनाग्रस्त कुटुंबांना बहिष्कृत करू नका. बहिष्कृत करण्याची भावना आजाराहून भयंकर आहे. यातून त्यांना मानसिक मनस्ताप होईल, असे वर्तन करू नका. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना धीर द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

ठळक मुद्देत्यांना गरज आहे तुमच्या मानिसक आधाराची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाग्रस्त कुटुंबांना बहिष्कृत करू नका. बहिष्कृत करण्याची भावना आजाराहून भयंकर आहे. यातून त्यांना मानसिक मनस्ताप होईल, असे वर्तन करू नका. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना धीर द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन महापौरसंदीप जोशी यांनी केले आहे.संदीप जोशी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण ठरलेल्या व्यक्तीच्या घरी भेट दिली. बाधित व त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला. कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. या विषाणूसोबत नागपूरकर नीडरपणे लढा देत आहेत. आपणही घाबरु नका. चिंता करू नका. आम्ही सारे तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास दिला. बाधिताशी चर्चा करून यापुढे आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन केले. कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे त्यांना आश्वस्त केले.नागपुरात जो कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यांच्यावर दुर्दैवाने बिकट परिस्थिती ओढवली आहे. त्यांच्याकडे मोलकरीण नाही. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सामाजिक बहिष्कार टाकल्यासारखे वागत आहेत, हे अयोग्य आहे. अशा परिवाराला काळजी घेत भेटल्यास आपल्याला कोणताही अपाय होणार नाही. परिवाराला धीर देणे, त्या परिवाराच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत महापौर या नात्याने आपण स्वत: या कुटुंबाला धीर देण्यासाठी आल्याची भावना संदीप जोशी यांनी व्यक्त केली. कुटुंबीयांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर, चिंता करू नका. संपूर्ण शहर आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांना दिला.कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. तो पसरू नये म्हणून काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण अनेक ठिकाणी नागरिक घाबरल्याने तर काही ठिकाणी बेफिकीर होऊन वागत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. याचा विचार करता जोशी यांनी मंगळवारी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे भेट देऊन रुग्णांकरिता असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली, उपाययोजनांचा आढावा घेतला. दोन्ही ठिकाणी प्रशासनाद्वारे जी व्यवस्था करण्यात आली आहे, त्याबद्दल प्रशंसा केली.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मिश्रा, वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे, मेयोचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे आदी उपस्थित होते. घाबरण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाने बाधित असलेले रुग्ण गुन्हेगार नाहीत. कुणावरही ही वेळ येऊ शकते. त्यामुळे त्याची काळजी योग्यप्रकारे घ्यायला हवी. कोरोनाबाधित रुग्णाचा परिवार हा आपलाच परिवार असून, रुग्णांचे नातेवाईक हे देखील आपलेच नातेवाईक आहेत. त्यांना धीर द्या, असे आवाहन जोशी यांनी यावेळी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका