शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण झाले म्हणजे कोरोना होणार नसल्याच्या भ्रमात राहू नका; ६३ टक्के लोकांना झाली लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 21:11 IST

Nagpur News लसीकरण झाले म्हणजे आपल्याला कोरोना होणार नसल्याच्या भ्रमात राहू नका. मागील १४ दिवसांत ५४ पैकी दोन्ही डोस घेतलेल्या ३४ म्हणजे, ६३ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देशहरात संपूर्ण लसीकरण ५० टक्केही नाही पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १७ लाखांवर

नागपूर : लसीकरण झाले म्हणजे आपल्याला कोरोना होणार नसल्याच्या भ्रमात राहू नका. मागील १४ दिवसांत ५४ पैकी दोन्ही डोस घेतलेल्या ३४ म्हणजे, ६३ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. शहरात लसीकरणाची मोहीम सुरू होऊन १० महिने होत आहेत.

आतापर्यंत १७ लाख ९५ हजार ३८१ लोकांनी पहिला डोस घेतला, तर १० लाख ६६ हजार ३८४ लोकांनी दोन्ही डोस घेतले. यात सर्वाधिक लसीकरण १८ ते ४४ या वयोगटात झाले. ४ लाख ८४ हजार ४५१ तरुणांचे संपूर्ण लसीकरण झाले. त्याखालोखाल ४५ ते ५९ वयोगटातील २ लाख ८१ हजार २९६ तर ६० वर्षांवरील १ लाख ८७ हजार ७९९ लोकांनी दोन्ही डोस घेतले. परंतु जवळपास २८ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात आतापर्यंत ५० टक्केही संपूर्ण लसीकरण झाले नसल्याचे चित्र आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी संसर्ग पसरल्यास याचा सर्वाधिक फटका लसीकरण न झालेल्यांना बसू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-बाधितांमध्ये दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक

१ ते १४ नोव्हेंबर दरम्यान शहरात ५४ लोकांना कोरोनाची लागण झाली. यात दोन्ही डोस घेतलेले ३४ रुग्ण, एकच डोस घेतलेले ५ रुग्ण तर लसीकरण न झालेले ९ रुग्ण आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या केवळ एका रुग्णाला गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून आली. परंतु आता त्याचीही प्रकृती सुधारत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उर्वरित ६ रुग्ण हे १८ वर्षांखालील आहेत.

- लसीकरण झाले तरी खबरदारी आवश्यक

कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी संसर्ग संपलेला नाही. दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये बेफिकिरी वाढल्यामुळेच त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी तातडीने लस घ्यावी.

- डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी मनपा

 

कालावधी : १ ते १४ नोव्हेंबर

बाधित रुग्ण : ५४

दोन्ही डोस झालेले रुग्ण : ३४

एकच डोस झालेले रुग्ण : ५

लसीकरणच न झालेले रुग्ण : ९

१८ वर्षांखालील रुग्ण : ६

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस