शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात गमावलेल्या मुलाचं पालकांकडून अवयव दान; दोघांना दृष्टी तर तिघांना जीवदान

By सुमेध वाघमार | Updated: March 22, 2024 18:27 IST

वडिलांकडून एकुलत्या एक मुलाचे अवयवदान, चंंद्रिकापुरे कुटुंबियांचा पुढाकार

नागपूर: रस्ता अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या एकुलत्या एक मुलाच्या अवयवदानासाठी ६० वर्षीय वडिलांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळणार आहे.ईशार्थ चंद्रिकापुरे, (वय २४) रा.  उंटखाना रोड, हनुमान नगर असे अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ईशार्थ हा मित्राला भेटण्यासाठी बुधवारला सायंकाळी ७ वाजता नागपूर येथून खापरी येथे दुचाकीने जात होता. वाटेत चिंचभवनच्या समोर एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी त्याल मिहान येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. ‘एम्स’च्या डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हता.

‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. आलोक उमरेडकर, डॉ. ओम शुभम असई, डॉ. प्रियंका टिकै त व डॉ. सुचेता मेश्राम यांनी ईशार्थला तपासून ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत असल्याची माहिती दिली.  ‘एम्स’च्या समन्वयक  प्रीतम त्रिवेदी आणि प्राची खैर यांनी नातेवाईकांना अवयव दानाविषयी समुपदेशन केले. ईशार्थचे ६०वर्षीय वडील विजय चंद्रिकापुरे यांनी त्या दु:खातही अवयवदानास संमती दिली. आई निशा (वय ४९) व बहिण आकांशा (वय २७) यांनीही ‘ईशार्थ’ला अवयवरुपी जीवंत ठेवण्याला मंजुरी दिली. ही माहिती, विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. त्यांच्याकडील प्रतिक्षा यादीनुसार गरजू रुग्णांना अवयवदान करण्यात आले. ‘एम्स’मधील १९वे ‘कॅ डेव्हर’‘एम्स’मध्ये आतापर्यंत १९ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवदान (कॅडेव्हर) झाले. ‘झेडटीसीसी’ने त्यांच्या प्रतिक्षा यादीनुसार, एक मूत्रपिंड ‘एम्स’ंमधील ३३वर्षीय पुरुषाला, दुसरे मूंत्रपिंड २३ वर्षीय एका पुरुष रुग्णाला तर यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले. ‘कॉर्निआ’ची जोडी ‘एम्स’नेत्रपेढीला दान करण्यात आली.

टॅग्स :Organ donationअवयव दान