शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला घालू नका, स्वत:च्या घरी नेण्याची न्यायालयाची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:28 IST

भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना शारीरिक इजा पोहोचविल्याच्या घटना रोज घडत आहेत.

नागपूर : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हैदोसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना शारीरिक इजा पोहोचविल्याच्या  घटना रोज घडत आहेत. परिणामी, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ही बाब लक्षात घेता भटक्या कुत्र्यांना कोणीही रस्ता, उद्याने यांसह कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नये, असा आदेश दिला.

रोज विनापरिश्रम खायला मिळत असल्यामुळे भटके कुत्रे विशिष्ट ठिकाणी टोळी करून राहतात. ते जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांवर धावून जातात. अनेकदा नागरिकांना चावतात. परिसरात घाण करून ठेवतात. त्यामुळे त्यांना आयते खायला देणे बंद करणे आवश्यक आहे. ज्यांना भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे, त्यांनी या कुत्र्यांना स्वत:च्या घरी घेऊन जावे. त्याकरिता महानगरपालिकेकडून रीतसर परवाना प्राप्त करावा. त्यानंतर भटक्या कुत्र्यांना वाटते तेवढे खाऊ घालावे. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा, असेही न्यायालयाने हा आदेश देताना सांगितले.

शहरातील भटक्या कुत्र्यांचा हैदोस थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, भटक्या कुत्र्यांनी जखमी केलेल्या नागरिकांना भरपाई देण्यात यावी, इत्यादी मागण्यांसह व्यावसायिक विजय तालेवार व मनोज शाक्य यांनी याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :dogकुत्रा