लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एफएसएसएआय नियमानुसार कुठल्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर त्यातील घटकांचा छापील उल्लेख करणे बंधनकारक आहे. पण आंतरराष्ट्रीय डॉमिनोझ कंपनी पिझ्झा या खाद्यान्नाच्या पॅकिंगवर त्यातील कोणत्याही घटकांचा उल्लेख न करता बाजारात थेट विक्री करीत आहे. एकप्रकारे डॉमिनोझ पिझ्झाची विक्री करून ग्राहकांना भ्रमित करीत आहे.या खाद्यान्नाची तपासणी स्थानिक प्रयोगशाळेत न होता केंद्रीय प्रयोगशाळेत व्हावी. याकरिता अन्न व प्रशासन विभागाने अद्याप कोणतीही पावले उचललेले नाही. या विरोधात अॅन्टीअॅडल्टेशन ग्राहक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मो. शाहीद शरीफ उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहे.या संदर्भात शरीफ यांनी माहितीच्या अधिकारात माहिती संकलित केली आहे. त्यांना डॉमिनोज पिझ्झाच्या आरएनडीमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. शरीफ यांनी सांगितले की, मध्य भारतात ज्युब्लिएंट फूड पार्क लिमिटेडतर्फे बुटीबोरी येथील प्लॉट क्र. बी-२११ येथे दरदिवशी पाच ते सहा ट्रक डॉमिनोज पिझ्झा तयार करून पाच राज्यांमध्ये पाठविण्यात येतो. तयार होणाऱ्या मालाच्या पॅकिंगवर एफएसएसएआय नियमानुसार कच्च्या मालाचा उल्लेख लोकहितासाठी असणे आवश्यक आहे. डॉमिनोज पिझ्झा ज्या मैद्यापासून तयार करण्यात येतो, त्याचे नावे फोर्टिफाईड मैदा आहे. त्याचे उत्पादन मुंबई येथे होते. या मैद्याच्या पॅकिंगवर थॅलेशिमिया आणि कमी आयर्न डायट असलेल्या लोकांसाठी प्रतिबंध असल्याचे नमूद केले आहे. ही सूचना अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी आहे. पण डॉमिनोज पिझ्झाने फोर्टिफाईड मैद्याचा उल्लेख न करता ग्राहकांचा विश्वासघात केला आहे.दुसरीकडे फोर्टिफाईड मैद्याचे उत्पादन करणारी कंपनी लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्व माहिती मैद्याच्या पोत्यावर प्रकाशित करीत आहे, पण ही सार्वजनिक माहिती डॉमिनोज पिझ्झाने ग्राहकांपासून लपवून ठेवली आहे. याचा उल्लेख आरटीआयच्या माध्यमातून १२ जानेवारी २०१८ ला करण्यात आलेल्या तपासणी अहवालात नमूद केला आहे. डॉमिनोजने एफएसएसएआय नियमांचे सर्रास उल्लंघन केले आहे.ही बाब नागपूरच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाला माहीत असतानाही त्यांनी अजूनही कारवाई का केली नाही, हे एक गूढच आहे. अशा स्थितीत विभागाने तातडीने दखल घेऊन दंड आकारणी आणि पॅकिंगवर कच्च्या मालाचा उल्लेख करण्यासाठी कारवाई करायला हवी होती. पण एफडीए कार्यालयाद्वारे कंपनीला संरक्षण मिळत आहे. विभागाने कारवाई न केल्यास या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शरीफ यांनी सांगितले.
डॉमिनोज पिझ्झाने केले ग्राहकांना भ्रमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 22:18 IST
एफएसएसएआय नियमानुसार कुठल्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर त्यातील घटकांचा छापील उल्लेख करणे बंधनकारक आहे. पण आंतरराष्ट्रीय डॉमिनोझ कंपनी पिझ्झा या खाद्यान्नाच्या पॅकिंगवर त्यातील कोणत्याही घटकांचा उल्लेख न करता बाजारात थेट विक्री करीत आहे. एकप्रकारे डॉमिनोझ पिझ्झाची विक्री करून ग्राहकांना भ्रमित करीत आहे.
डॉमिनोज पिझ्झाने केले ग्राहकांना भ्रमित
ठळक मुद्दे शरीफ हायकोर्टात याचिका दाखल करणार : पॅकिंगवर घटकांचा उल्लेख नाही