शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळावर घरगुती प्रवाशांची तपासणीच नाही : विमानतळावर यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 20:40 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची डॉक्टर आणि त्यांच्या चमूतर्फे आधुनिक उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येत आहे, पण घरगुती प्रवाशांची तपासणी करण्यात येत नसल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देमंत्रालयाकडून आदेश नाहीत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची डॉक्टर आणि त्यांच्या चमूतर्फे आधुनिक उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येत आहे, पण घरगुती प्रवाशांची तपासणी करण्यात येत नसल्याची बाब पुढे आली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्यानंतरही प्रवाशांची तपासणी करण्यात येत नसल्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.विदेशातून मुंबई आणि दिल्ली येथे आलेल्या प्रवाशांची त्या त्या विमानतळावर वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. पण हेच प्रवासी विमानाने नागपुरात येतात तेव्हा त्यांची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे नागपुरात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागपुरात दोहा आणि शारजाह येथून दोन आंतरराष्ट्रीय विमाने नागपुरात येतात. या सर्व प्रवाशांची डॉक्टरांतर्फे अद्ययावत उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता विदेशातून केवळ भारतीय प्रवासी येत आहेत. आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.विमानतळ प्रशासनाला ५ मार्चच्या रात्री केंद्रीय मंत्रालयाकडून आदेश आल्यानंतर त्वरित विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) विमानतळावर हेल्प डेस्क स्थापन केला आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोन डॉक्टर, दोन पॅरामेडिकल स्टॉफ, नर्स आणि एमआयएलचे अधिकारी तैनात आहेत. त्यांच्यातर्फे प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. संशयित प्रवाशाला बाहेर काढून त्याला पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे अधिकारी म्हणाले.घरगुती प्रवाशांना तपासणीचे आदेश नाहीतसध्या केंद्रीय मंत्रालयाकडून विमानतळावर घरगुती प्रवाशांच्या तपासणीचे आदेश नाहीत. पण आदेश आल्यास आम्ही तपासणी करू. देशातील अन्य विमानतळावर आदेश आल्यास आम्हालाही येतील. विमानतळावर सर्व यंत्रणा सज्ज आहे. आम्ही मंत्रालयातील अधिकाºयांच्या निरंतर संपर्कात आहोत. सध्या कतार एअरलाईन्सने २० ते २५ आणि एअर अरेबिया एअरलाईन्सने जवळपास ८० प्रवासी येत आहेत. सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. एम. ए. आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर