शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दोहा-नागपूर चार्टर फ्लाईट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 22:57 IST

एअर बबल करारानुसार दोहा ते नागपूर ही नियोजित फ्लाईट सेवा संचालित केली जाणार होती. ठरल्यानुसार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कतारवरून चार्टर फ्लाईट प्रवासी घेऊन येणार होती. मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. सध्या दोहा ते नागपूरसाठी येणाऱ्या अशा सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे१८ ते ३१ ऑगस्टपर्यंत उड्डाणाचे होते नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअर बबल करारानुसार दोहा ते नागपूर ही नियोजित फ्लाईट सेवा संचालित केली जाणार होती. ठरल्यानुसार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कतारवरून चार्टर फ्लाईट प्रवासी घेऊन येणार होती. मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. सध्या दोहा ते नागपूरसाठी येणाऱ्या अशा सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दोहा ते नागपूर फ्लाईटचे नियोजन करण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, काही एअरलाईन्सला परवानगी मिळालेली नाही. खाडी देशामध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त आहेत. कुवेतमध्येसद्धा भारतीय मोठ्या प्रमाणावर आहेत. ते सर्वजण भारतामध्ये परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत.अशा परिस्थितीमध्ये नागपूरहून संचालित होणाऱ्या कतार एअरवेज व एअर अरेबिया ही (नागपूर-शारजाह-नागपूर) अशी फेरी असलेली पूर्वनियोजित विमानसेवा कधी पूर्ववत होणार, याबद्दल कसलीही निश्चितता नाही.पुणे, मुंबई फ्लाईट झाली रद्दमंगळवारी इंडिगोची पुणे व गोबएअरची मुंबई फ्लाईट रद्द झाली. इंडिगो एअरलाईन्सची फ्लाईट ६ई ६२१६/६२१७ पुणे-नागपूर-पुणे सायंकाळी ७.३० वाजता नागपुरात पोहचते व रात्री ८.३५ वाजता पुण्याला रवाना होते. एअरलाईन्सकडून सांगण्यात आले की, उड्डाण रद्द झाल्यासंदर्भातील सूचना प्रवाशांना देण्यात आली होती. ही वेळेवर रद्द झाली नाही. त्याचबरोबर नागपूर-मुंबई-नागपूर गो-एअरची फ्लाईटसुद्धा रद्द झाली. गो-एअरची फ्लाईट रद्द होणे नवीन नाही. सूत्रानुसार गो-एअर आता संकटात आहे. गो-एअरचे क्रेडिट संपलेले आहे. त्यामुळे कॅश अ‍ॅण्ड क्रेडिटवर चालविण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर