हिंगणा/ गुमगाव : चार वर्षीय चिमुकली खेळत असताना एकटीच वेणा नदीच्या दिशेने गेली. त्यातच ती नदीच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडली. कुत्र्यांनी अक्षरश: लचके ताेडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव येथे गुरुवारी दुपारी घडली.
हर्षिता रामसिंग चौधरी (४, रा. गुमगाव, ता. हिंगणा) असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. हषिताचे आई, वडील मूळचे राजस्थानातील रहिवासी असून, ते कामानिमित्त हिंगणा तालुक्यात आल्याने गुमगाव येथील रेखा रामटेके यांच्याकडे सात वर्षांपासून किरायाने राहतात, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.