शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

श्वानांची ‘शी’ची डोकेदुखी, दररोज सकाळी तोंडातोंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:17 IST

दररोज सकाळी वस्त्यांमध्ये कुत्र्यांच्या ‘शी’वरून लोकांची तोंडातोंडी अनुभवायला मिळत आहे. कुत्रे हे भांडणाचे कारण ठरत असून, त्यांना आवरण्यासाठी लोकांनी काही कल्पक युक्त्याही केल्या आहेत. मात्र कुत्र्यांचा त्रास काही कमी होताना दिसत नाही. सध्याच्या वातावरणात गल्लोगल्लीत हा प्रकार दिसतो आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : घरापुढे संदेशाचे फलक, रंगाच्या बाटल्याही लावून नाही फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दररोज सकाळी वस्त्यांमध्ये कुत्र्यांच्या ‘शी’वरून लोकांची तोंडातोंडी अनुभवायला मिळत आहे. कुत्रे हे भांडणाचे कारण ठरत असून, त्यांना आवरण्यासाठी लोकांनी काही कल्पक युक्त्याही केल्या आहेत. मात्र कुत्र्यांचा त्रास काही कमी होताना दिसत नाही. सध्याच्या वातावरणात गल्लोगल्लीत हा प्रकार दिसतो आहे.पावसाळ्यात सकाळी उठल्यानंतर गेटपुढे कुत्र्यांची ‘शी’ बघितल्यावर चेहऱ्यावरचे किळसवाणे भाव उमटवीत, लोकांच्या तोंडातून शिवाशापच निघत आहेत. आजूबाजूच्या घरी जर कुत्रा असेल, तर हमखास तोंडातोंडी झालीच म्हणून समजा. अनेकजण कुत्रे पाळतात मात्र त्यांना रात्री मोकाट सोडून देतात आणि ते कुत्रे स्वच्छ जागा बघूनच ‘शी’ करतात. पाळीव कुत्र्यांबरोबरच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोकाट कुत्र्यांचाही वावर मोठ्या प्रमाणात वाढतो. रात्रीला तर रस्त्यांवर कुत्र्यांचा जमघट बघायला मिळतो. कुत्र्यांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. भांडणेही वाढली आहे. काही लोकांनी या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून नामी शक्कलही लढविल्या आहेत. काही लोकांनी घरापुढे व्यंगात्मक संदेशही लावले आहे. प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये लाल रंगाचे पाणी भरून ठेवल्यास कुत्रे ‘शौच’ करीत नाही, असा समज शहरभर पसरला आहे. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये कम्पाऊंडच्या भिंतीपुढे लाल रंगाच्या बाटल्या लावलेल्याही दिसत आहेत. या क्लृप्त्याही फोल ठरत आहेत. लाल रंगाच्या बाटल्या लावूनही कुत्रे शौच करून जात आहेत.कुत्र्यांचा सेन्स ऑफ स्मेल माणसांपेक्षा १०० पट जास्त असतोयासंदर्भात शहरातील प्रसिद्ध पशुचिकित्सक डॉ. हेमंत जैन यांनी सांगितले की, कुत्र्यांना शौच करण्यासाठी स्वच्छ, कोरडी जागा हवी असते. कुत्र्यांच्या घरापुढे शौच करण्याच्या प्रकाराला त्यांनी सेंट मार्किं ग असेही म्हटले आहे. एखाद्याच्या घरी कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला आकर्षित करण्यासाठी कुत्रे शौच किंवा लघवी करीत असतात. त्यामुळे कुत्रा असलेल्यांच्या आजूबाजूच्या घरांना हमखास कुत्र्यांच्या शौच व लघवीचा त्रास होतो. पावसाळ्याच्या वातावरणात कुत्री हीटवर येतात. कुत्र्यांचा ‘सेन्स ऑफ स्मेल’ माणसांपेक्षा १०० पटीने जास्त असतो. त्यामुळे कुत्री हीटवर आहे हे कुत्र्यांना दूरवरूनच कळत असल्याने, अनेक कुत्रे त्या परिसरात वावरत असतात.कुत्रे कलर ब्लाईंड असतातकुत्र्यांना डोळ्यांनी रंग ओळखता येत नाही. कुत्र्यांच्या डोळ्यांमध्ये कोनाची संख्या कमी असते, काही प्रमाणात कुत्रे पिवळा व निळा रंग ओळखतात. ते कलर ब्लाईंड असल्यामुळे लाल बॉटलचा काहीच परिणाम होत नाही. ती अंधश्रद्धाच आहे, असेही डॉ. जैन म्हणाले.कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी हे कराकुत्र्यांनी शौच करू नये म्हणून व्हिनेगरचा स्प्रे कम्पाऊंडच्या भिंतीवर करावा. मिरेपूड, मिरची पावडर टाकली तरी, कुत्रे भटकत नाहीत.

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर