शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत डॉक्टरांचा आज ‘व्हाईट अलर्ट’; उद्या ‘ब्लॅक अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 09:39 IST

कोरोनाच्या काळात ‘फ्रंटलाइनवर’ काम करणाऱ्या डॉक्टरांवर देश•ारात हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. याचा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने निषेध व्यक्त केला आहे. त्या पार्श्व•ाूमीवर २२ एप्रिल रोजी 'व्हाईट अलर्ट' तर २३ एप्रिल रोजी ‘ब्लॅक अलर्ट’ पाळला जाणार आहे.

ठळक मुद्दे डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात आयएमए

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या काळात ‘फ्रंटलाइनवर’ काम करणाऱ्या डॉक्टरांवर देशभरात हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. याचा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने निषेध व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल रोजी 'व्हाईट अलर्ट' तर २३ एप्रिल रोजी ‘ब्लॅक अलर्ट’ पाळला जाणार आहे.‘आयएमए’ नागपूर शाखेच्या सचिव डॉ. मंजूषा गिरी यांनी सांगितले, कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर जिवापाड प्रयत्न करत आहेत. तरीही डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि समाजाकडून त्यांची होणारी वंचना थांबलेली नाही. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाºया, ‘आयएमए’ सदस्य डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी, या ऑथोर्पेडिक सर्जन असलेल्या तरुण डॉक्टरांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. या डॉक्टरांच्या अंत्यसंस्कारामध्ये तेथील स्थानिक लोकांनी अडथळा आणला. अंत्ययात्रेसाठी आलेल्या डॉक्टरांच्या शोकाकुल परिवारावर अमानुष हल्ला केला. एवढेच नव्हे तर डॉक्टरांच्या मृतदेहाबाबत अत्यंत अशोभनीय, असंस्कृत आणि अमानवी वर्तन तेथील समाजकंटकांनी केले. अशाच घटनांची पुनरावृत्ती डॉ. सायमन आणि डॉ. सिओलो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत झाली. याचा ‘आयएमए’ निषेध व्यक्त करते. म्हणून डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी हिंसाचार विरोधी केंद्रीय कायदा व्हावा, या मागणीसाठी आम्ही बुधवार २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आयएमएचे सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवतील व राष्ट्राला पांढरा इशारा म्हणजे ‘व्हाईट अलर्ट’ देतील. या आंदोलनानंतरही डॉक्टर आणि रुग्णालयांवरील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार कायदा करण्यास सरकार अपयशी ठरल्यास. आयएमए गुरुवार २३ एप्रिल रोजी काळा दिवस म्हणजे ‘ब्लॅक अलर्ट’ म्हणून जाहीर करेल. या दिवशी देशातील सर्व डॉक्टर काळी फीत लावून आपले काम करतील. काळा दिवसानंतरही शासनाने योग्य पावले उचलली नाहीत तर त्या पुढील पावले उचलणारे निर्णय घेतले जातील.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस