शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या संपाने नागपुरातील रुग्णव्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:00 IST

केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात देशभरातील खासगी डॉक्टरांनी लाक्षणिक संप पुकारला होता. यासाठी दिवसभर खासगी क्लिनिक व रुग्णालये बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले होते. या माध्यमातून डॉक्टरांनी प्रतिकात्मक धिक्कार दिवस पाळला. शहरात खासगी क्लिनिकसह ६०० रुग्णालयांनी बंद पाळल्यामुळे रुग्णव्यवस्था कोलमडल्याचे चित्र होते.

ठळक मुद्दे६०० खासगी रुग्णालये होती बंद : मेडिकल कमिशन विधेयकाला आयएमएचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात देशभरातील खासगी डॉक्टरांनी लाक्षणिक संप पुकारला होता. यासाठी दिवसभर खासगी क्लिनिक व रुग्णालये बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले होते. या माध्यमातून डॉक्टरांनी प्रतिकात्मक धिक्कार दिवस पाळला. शहरात खासगी क्लिनिकसह ६०० रुग्णालयांनी बंद पाळल्यामुळे रुग्णव्यवस्था कोलमडल्याचे चित्र होते.डॉक्टरांनी पुकारलेल्या संपात महाराष्ट्रातूनच ४२ हजार डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. केंद्र शासनाने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया बरखास्त करून नॅशनल मेडिकल कमिशन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील डॉक्टरांनी या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध केला आहे. हे विधेयक ३० जुलै रोजी संसदेत सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे हे विधेयक केंद्र शासनाने संसदेत मांडू नये म्हणून डॉक्टरांनी शनिवारी संपवजा धिक्कार दिवसाचे हत्यार उपसले. शहरातील जवळपास ६०० क्लिनिक व खासगी रुग्णालये पूर्णत: बंद होती. त्यामुळे खासगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना थोडाफार त्रास सहन करावा लागला. खासगी क्लिनिक व रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र शहरात होते. उपचार मिळविण्यासाठी रुग्णांची धावाधाव झाली. शेवटी, नाईलाजास्तव रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागले. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा शासकीय रुग्णालयांमध्ये आजच्या ‘ओपीडी’त वाढ झाल्याची माहिती आहे. या विधेयकाविरोधात शहरातील हजारो डॉक्टरांनी संप पुकारून आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल यांनी सांगितले. का होतोय विरोधसध्या अस्तित्वात असलेल्या मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियामध्ये ८० टक्के सदस्य निवडून येतात, तर इतर २० टक्के सदस्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, नव्या विधेयकानुसार कमिशनवर केवळ पाच जण निवडून जाणार असून, बाकी जागा केंद्र शासन भरणार आहे. त्यामुळे हे कमिशन संपूर्णत: केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. यावर राज्य शासनाचा कुठलाही अधिकार नसेल. त्यामुळेच खासगी डॉक्टरांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. आंदोलन आणखी तीव्र होईलखासगी डॉक्टरांनी आज उत्स्फूर्त बंद पुकारून सांकेतिक धरणे दिले. शासनाने खासगी डॉक्टरांना विश्वासात न घेतल्यास, मागण्या मान्य न केल्यास रुग्णहितासाठी यापुढे तीव्र आंदोलन होईल, असा इशारा आयएमएचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल यांनी दिला.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलStrikeसंप