शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणीच्या नावावर डॉक्टर वेठीस : निमा संघटनेची हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:42 IST

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने (एमसीआयएम) नोंदणी नुतनीकरण्याच्या नावावर डॉक्टरांकडून कोट्यवधी रुपयांची नियमबाह्य वसुली सुरू केली आहे. याप्रकरणी ‘निमा’ संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती डॉ. रवींद्र बोथरा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देनुतनीकरणाच्या नावावर नियमबाह्य वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने (एमसीआयएम) नोंदणी नुतनीकरण्याच्या नावावर डॉक्टरांकडून कोट्यवधी रुपयांची नियमबाह्य वसुली सुरू केली आहे. याप्रकरणी ‘निमा’ संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती डॉ. रवींद्र बोथरा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) राज्य शाखेद्वारे ‘एमसीआयएम’च्यावतीने राबविण्यात येणाऱ्या नोंदणी नुतनीकरणाच्या पद्धतीला उच्च न्यायालयात २५ मार्च २०१९ रोजी याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. ‘ऑनलाईन’ नोंदणी नुतनीकरण करण्याच्या नावाखाली ‘एमसीआयएम’ने वैद्यकीय व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप डॉ. बोथरा यांनी केला. ते म्हणाले, नागपुरात २० हजार तर संपूर्ण राज्यात ‘निमा’चे ८९ हजार सदस्य आहेत. २०११ मध्ये ‘एमसीआयएम’च्या निकष आणि नियमाप्रमाणेच डॉक्टरांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन ‘ऑनलाईन’ नोंदणी करण्यात आली. त्यानंतर ‘एमसीआयएम’ डॉक्टरांना अधिकृत ओळखपत्रही दिले. आता मात्र ‘एमसीआयएम’ने अधिकृत निर्णय न घेता केवळ परिपत्रक काढून नुतनीकरणाच्या नावावर डॉक्टरांकडून वसुलीचा सपाटा लावला आहे. १८ एप्रिल २०१९ पर्यंत जे वैद्यकीय व्यवसायी नोंदणी करतील, त्यांना परिषदेद्वारे जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या नोंदणी नुतनीकरण केंद्रावर प्रत्यक्ष पडताळणी कागदपत्रांचे स्कॅनिंग झाल्यावर नवीन नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र व माहिती पुस्तिका हस्तांतरित केली जाणार आहे. सोबतच जुने नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र जमा करावे लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नोंदणीचे नुतनीकरण पूर्ण झाल्याचे समजण्यात येणार आहे. हा प्रकार म्हणजे डॉक्टरांना वेठीस धरणारा असल्याचेही डॉ. बोथरा म्हणाले. पत्रपरिषदेला डॉ. शैलेंद्र अग्रवाल, डॉ. पंकज भोयर, डॉ. विनोद गंभीर, डॉ. अशोक पवार, डॉ. नाना पोजगे, डॉ. मोहन येंडे, डॉ. वीणा पंचभाई, डॉ. प्रवीण डांगोेरे, डॉ. अस्मिता कडू आदी उपस्थित होते.नोंदणीचे शुल्क ३५०० वरदर पाच वर्षांनी नोंदणी, नुतनीकरण केले जाते. मोफत असलेली नोंदणी कालावधीत न केल्यास पूर्वी विलंब शुल्क म्हणून ५० रुपये दिले जायचे. आता नोंदणी, नुतनीकरणासाठी ३२०० रुपये लागतात. विलंब झाल्यास ३५०० रुपये आणि त्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यास प्रत्येक महिन्याला १०० रुपये वसूल केले जाणार आहेत. यामुळे ‘निमा’ संघटनेने या मनमानीविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टर