शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डॉक्टरांचा बेमुदत संप बुधवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:46 IST

‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ बुधवार ७ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जात आहे. याबाबतची सूचना सोमवारी मेडिकल मार्डने अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना दिली. या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमार्डने दिला इशारा : मेयो, मेडिकलची रुग्णसेवा होणार विस्कळीत!

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ बुधवार ७ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जात आहे. याबाबतची सूचना सोमवारी मेडिकल मार्डने अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना दिली. या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.‘एनएमसी’ विधेयकाच्या विरोधात गेल्याच आठवड्यात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारला असता, आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही या विधेयकाला विरोध करणे सुरू केले होते. सोमवारी ‘सेंट्रल मार्ड’ने यावर निर्णय घेत संपाचा इशारा दिला. या संदर्भाचे एक पत्र नागपूर मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे यांच्या नेतृत्वात सोमवारी डॉ. मित्रा यांना, तर मेयो मार्डने अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना दिले.‘लोकमत’शी बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘एनएमसी’ विधेयकामुळे गरीब घरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महागणार आहे. विधेयकात ‘ब्रीजकोर्स’ला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे रुग्णहित धोक्यात आले आहे. ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमामध्ये एकच परीक्षा राहणार आहे. परिणामी, भ्रष्टाचार फोफावून गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. यामुळे ‘मार्ड’ या विधेयकाच्या विरोधात आहे. या मागणीसोबतच निवासी डॉक्टरांचा विद्यावेतनाचा तिढा अद्यापही सुटला नाही. आजही दोन महिन्याचे विद्यावेतन प्रलंबित आहे; शिवाय इतर राज्याच्या तुलनेत कमी विद्यावेतन दिले जाते. यात पाच हजार रुपयांनी वाढ करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात आकस्मिक विभागातील डॉक्टरही सहभागी होणार असल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप