शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनो संवाद सांभाळा

By admin | Updated: June 27, 2017 02:02 IST

डॉक्टरांवरील हल्ले हे डॉक्टर-रुग्ण बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे. डॉक्टरांना संरक्षण देणाऱ्या कायद्याबरोबर रुग्णाबरोबरच्या संवादाला महत्त्व दिले पाहिजे.

अतुल कुलकर्णी यांचे आवाहन : सोसायटी आॅफ क्रिटीकल केअर मेडिसीनची नवीन कार्यकारिणीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टरांवरील हल्ले हे डॉक्टर-रुग्ण बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे. डॉक्टरांना संरक्षण देणाऱ्या कायद्याबरोबर रुग्णाबरोबरच्या संवादाला महत्त्व दिले पाहिजे. परंतु अनेकवेळा कामाच्या व्यस्ततेमुळे डॉक्टरांना संवाद साधणे शक्य होत नाही. विशेषत: अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना अनेकवेळा हीच बाब अडचणीची जाते. संवाद नीट नसल्याने अनेकवेळा गैरसमज निर्माण होऊन वादाला तोंड फुटते. म्हणूनच या विभागातील डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलताना संवाद सांभाळावा, असे आवाहन टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे अत्यवस्थ सेवासुश्रुषातज्ज्ञ डॉ. अतुल कुळकर्णी यांनी येथे केले.‘सोसायटी आॅफ क्रिटीकल केअर मेडिसीन’, नागपूर विभागाचा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर डॉ. सुभल दीक्षित, प्रसिद्ध मनोचिकित्सक डॉ. सुधीर भावे, नवनिर्वाचित अध्यक्ष अध्यक्ष डॉ. निखील बालंखे, सचिव डॉ. आशिष गांजरे, डॉ. इम्रान नूर मोहम्मद, माजी अध्यक्ष डॉ. दीपक जैस्वानी व सचिव डॉ. कमल भुतडा उपस्थित होते. डॉ. सुभल दीक्षित यांनी अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या पोषक आहारावर लक्ष वेधले. ते म्हणाले, गंभीर रुग्णांवर उपचार करताना त्याच्या आहाराचेही नियोजन करणे आवश्यक आहे. तोंडावाटे आहार घेणारे रुग्ण लवकर बरे होतात, असेही ते म्हणाले. डॉ. सुधीर भावे यांनी रुग्णाच्या आजाराची, उपचाराची व मृत्यूची माहिती देताना नातेवाईकांशी साधला जाणारा संवाद यावर भर दिला. रुग्णाचे नातेवाईक कुठे ‘अ‍ॅग्रेसीव्ह’ होतात, त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल, याची माहिती दिली. दरम्यान, डॉ. निखील बालंखे यांनी अध्यक्षपदाची तर डॉ. आशिष गांजरे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. सोबतच कोषाध्यक्ष डॉ. इम्रान नूर मोहम्मद, कार्यकारी सदस्य डॉ. शाहनवाज सिद्दीकी, डॉ. तुषार पांडे, डॉ. प्रकाश ढोके, डॉ. रितेश चव्हाण, डॉ. विनय कुळकर्णी, डॉ. वीरेंद्र भेलकर आदींनीही पदभार स्वीकारला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निता देशपांडे यांनी केले.