शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्ण सेवेत सर्वच विभागाचे डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 21:38 IST

‘कोविड-१९’ रुग्ण सेवेचा भार औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) व बधिरीकरणशास्त्र विभागाच्याच डॉक्टरांवर पडल्याची गंभीर दखल शासनाने घेतली, इतरही विभागातील डॉक्टरांवर विशेषत: अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टरांकडे कामे सोपवावीत असे निर्देश देण्याची वेळ शासनावर आली.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलने नेमून दिली जबाबदारी : अचिकित्सालयीन डॉक्टरांना सहभागी करून घेण्याचे शासनाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोविड-१९’ रुग्ण सेवेचा भार औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) व बधिरीकरणशास्त्र विभागाच्याच डॉक्टरांवर पडल्याची गंभीर दखल शासनाने घेतली, इतरही विभागातील डॉक्टरांवर विशेषत: अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टरांकडे कामे सोपवावीत असे निर्देश देण्याची वेळ शासनावर आली. परंतु मेयो, मेडिकलमध्ये पूर्वीपासूनच कोविड रुग्णसेवेत सर्वच विभागातील डॉक्टरांची ड्युटी लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. मेडिकलने एक पाऊल पुढे टाकत डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रीक आजपासून सुरूही केले. ‘कोविड-१९’ रुग्णांवर उपचार करणे, त्यांची नोंद ठेवणे, आॅनलाईन माहिती भरणे, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आदी कामांचा ताण मेडिसीन व बधिरीकरणशास्त्र या दोनच विभागाच्या डॉक्टरांवर पडला आहे. यात इतर विभागातील डॉक्टर मदत करीत नसल्याची बाब समोर आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टरांना कामच नाही. सकाळी ११ वाजता येऊन दुपारी २ वाजता घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. या संदर्भात तक्रारी झाल्याने शासनाने याची स्वत: दखल घेतली. १९ मे रोजी परिपत्रक काढून मेडिसीन व बाधिरीकरणशास्त्र विभागातील डॉक्टर वगळता सर्व विभागातील डॉक्टर व कर्मचाºयांनी दररोज कर्तव्यावर हजर राहण्याचे व अधिष्ठात्यांनी नेमून दिलेली कामे करण्याचे निर्देश दिले. जे डॉक्टर व कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नाहीत किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्याविरूद्ध शासकीय कामकाजात कसूर केल्यामुळे शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे व अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टर व कर्मचाºयांवर साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. परंतु मेयो, मेडिकलने कोविड रुग्णांची संख्या वाढताच प्रत्येक डॉक्टरची सात दिवसाच्या कालावधीसाठी कोविड वॉर्डात ड्युटी लावली असल्याचे येथील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. मेडिकलमध्ये एका विभागात अर्धे डॉक्टर ड्युटीवर तर अर्धे डॉक्टर सुटीवर राहत असल्याची माहिती आहे. मेयोतही काही वरिष्ठ डॉक्टर दुपारी २ नंतर रुग्णालयातून गायब होत असल्याची चर्चा आहे. परंतु आता शासनाचे कडक निर्देश आल्याने किती डॉक्टर व कर्मचारी जबाबदारपणाने सेवा देतात त्याकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर