शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढले, रुग्णाचा मृत्यू मुलाची : पोलिसांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 22:32 IST

Doctor removes ventilator, patient dies उपचाराची रक्कम जमा करण्यास विलंब होत असल्याचे पाहून रुग्णालय प्रशासनाने एका रुग्णाचे व्हेंटिलेटर काढून घेतले. त्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मृत दिलीपराव कडेकर यांचा मुलगा प्रणित याने गुरुवारी दुपारी पाचपावली पोलीस ठाण्यात नोंदविली.

ठळक मुद्देसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रक्कम जमा करण्यास विलंब क्रिस्टल नर्सिंग होममधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपचाराची रक्कम जमा करण्यास विलंब होत असल्याचे पाहून रुग्णालय प्रशासनाने एका रुग्णाचे व्हेंटिलेटर काढून घेतले. त्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मृत दिलीपराव कडेकर यांचा मुलगा प्रणित याने गुरुवारी दुपारी पाचपावली पोलीस ठाण्यात नोंदविली.

न्यू सुभेदार लेआउट येथील दिलीपराव कडेकर यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना २१ एप्रिलला पाचपावलीतील क्रिस्टल नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. प्रारंभीच हॉस्पिटल प्रशासनाकडे दोन लाख रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर सांगितलेले औषध त्यांचा मुलगा प्रणितने हॉस्पिटल प्रशासनाला आणून दिले. दरम्यान, आतापर्यंत जो उपचार झाला त्याच्या बिलाबाबत दाखवा, असे प्रणितने म्हटले. क्रिस्टल हॉस्पिटलच्या प्रशासनाने दाखविलेल्या बिलावर प्रणितने आक्षेप नोंदविला. त्यामुळे प्रशासनाने यावेळी आपल्याला वडिलांच्या बाजूच्या बेडवर असलेल्या चौधरी नामक रुग्णाच्या नातेवाइकांसोबत फोनद्वारे झालेले संभाषण ऐकवले. यावेळी त्यांनी चौधरींची सपोर्ट सिस्टम काढून घेण्यात येईल, अशी धमकी दिली होती. हाच प्रकार तुमच्यासोबतही होऊ शकतो, असे आपल्यालाही धमकावून सांगण्यात आल्याचा प्रणितचा आरोप आहे. या प्रकारानंतर डॉक्टरांनी आपल्या वडिलांच्या उपचारांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. १२ मे रोजी डॉक्टरांनी पुन्हा पैसे जमा करण्यास सांगितले. आपण पैसे जमा करण्यासाठी काही वेळ मागितला असता डॉक्टरांनी १२ मे रोजी दुपारी व्हेंटिलेटर काढून घेतले. त्यामुळे काही वेळातच वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला हॉस्पिटल प्रशासन कारणीभूत असल्यामुळे या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे प्रणितने पाचपावली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी

गुरुवारी दुपारी प्रणित कडेकरने ही तक्रार पाचपावली ठाण्यात नोंदवली. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर संदीप जोशी आणि इतर सहकारी होते. पोलिसांनी ती तक्रार स्वीकारली असून प्रकरण चौकशीसाठी ठेवले आहे. दरम्यान, हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी महापौर जोशी यांनी केली आहे

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल