शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वनविकास अधिकाऱ्यांना कारागृहात पाठवायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:11 IST

वन विकासाकरिता १३४ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या वृक्षारोपणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संतप्त होऊन महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कारागृहात पाठवायचे काय, असा सवाल उपस्थित केला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा संतप्त सवाल : वृक्षारोपणात मोठा आर्थिक गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वन विकासाकरिता १३४ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या वृक्षारोपणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संतप्त होऊन महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कारागृहात पाठवायचे काय, असा सवाल उपस्थित केला.न्यायालयाने यासंदर्भात महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे सेवानिवृत्त लेखा साहायक मधुकर चोपडे यांच्या पत्रावरून जनहित याचिका दाखल केली आहे. १९८८ ते २००३ या काळात खामगाव वनप्रकल्प विभागात रोजगार हमी योजनेंतर्गत झाडे लावण्याची ३६१ कामे करण्यात आलीत. त्यासाठी बुलडाणा येथील उपवनसंरक्षकांनी १३४ कोटी रुपये दिले. या रकमेत किती झाडे लावण्यात आली, लावलेल्या झाडांची जातनिहाय संख्या, लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जिवंत आहेत, जिवंत झाडांची जातनिहाय संख्या, जिवंत झाडापासून शासनास किती रुपये महसूल प्राप्त झाला याची माहिती चोपडे यांनी मागितली होती. परंतु, त्यांना माहिती देण्यात आली नाही. गैरव्यवहार उघडकीस येऊ नये यासाठी यासंदर्भात खरी माहिती लपविण्यात येत असल्याचे चोपडे यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने आता या प्रकरणावर १८ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली असून त्यावेळी यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश महामंडळाला दिला. न्यायालय मित्र अ‍ॅड. रोहित मासुरकर यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयforest departmentवनविभाग