शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

मनोरुग्णांकडे दुर्लक्ष का ?

By admin | Updated: June 24, 2014 01:02 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयात जून महिन्यात पहिल्या आठवड्यात लागोपाठ चार रुग्णांचा जीव गेला. यातील दोन रुग्ण वॉर्डातच मृतावस्थेत आढळून आले. आता पाच रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत.

पाच रुग्ण मेडिकलमध्ये : अटेंडन्ट, डॉक्टरांची पदे रिक्तनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात जून महिन्यात पहिल्या आठवड्यात लागोपाठ चार रुग्णांचा जीव गेला. यातील दोन रुग्ण वॉर्डातच मृतावस्थेत आढळून आले. आता पाच रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. यातील दोन रुग्ण गंभीर आहेत. रुग्ण गंभीर होईपर्यंत त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा धक्कादायक हा प्रकार समोर आला आहे.बदलत्या जीवनशैलीचा परिणाम मनावरही होऊ लागला आहे. मनोविकाराच्या रुग्णांत वाढ होऊ लागल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात २०१० मध्ये ४१ हजार ८२८ रुग्णांची नोंद झाली होती, २०१३ मध्ये यात ११ हजार १७८ रुग्णांची वाढ होऊन रुग्ण संख्या ५३ हजार ६ वर गेली आहे. यात पुरुषांची संख्या अधिक असून स्क्रि झोफेनिया (नैराश्य) आणि डिप्रेशनच्या (खिन्नता) रु ग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या मनोरुग्णालयात ५०० च्यावर स्त्री व पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मनोविकारतज्ज्ञांची साथ मोलाची. मात्र, डॉक्टरांपासून ते अटेंडन्ट यांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. रुग्णालयात वर्ग ‘अ’मधील नऊ मनोविकारतज्ज्ञांची पदे मंजूर आहेत, परंतु प्रत्यक्षात वर्ग ‘अ’मधील एक आणि उर्वरित चार मनोविकारतज्ज्ञ हे वर्ग ‘ब’मधील आहेत. विशेष म्हणजे, ‘अ’ वर्गातील डॉक्टर हे वैद्यक औषधशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून त्यांनी रुग्णांना तपासणेच बंद केल्याची माहिती आहे. मनोरुग्णांची देखरेख व देखभाल करण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य अटेंडन्टचे आहे. परंतु त्यांची संख्याही फार कमी आहे. मनोरुग्णालयात १८२ पुरुष अटेंडन्टची पदे मंजूर असताना मागील पाच वर्षांपासून ४० पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)प्रत्यक्ष रुग्णसेवेत फक्त ५८ अटेंडन्ट४\मनोरुग्णालयात सध्याच्या स्थितीत १४० अटेंडन्ट आहेत. यातील कार्यालयीन कामामध्ये ६, बाह्यरुग्ण विभागात ११, लिपिकाच्या कामासाठी ४, गार्डरुममध्ये ९, डेप्युटेशन्सवर ८, स्वयंपाक खोलीत १५, आॅक्युपेशन थेरपीमध्ये ६, उद्यानात ६ तर ५ जण निलंबित आहेत. यातच आठ अटेंडन्ट मागील वर्षापासून गैरहजर आहेत. दोन अटेंडन्ट रोज रजेवर असतात तर दोन फार्मासिस्ट असताना औषधांचे वितरण करतात. असे एकूण तब्बल ८२ अटेंडन्ट रुग्णसेवेच्या बाहेर आहेत. फक्त ५८ अटेंडन्ट रुग्णसेवेत आहेत. यातही दर वर्षी तीन अटेंडन्ट सेवानिवृत्त होत आहेत. अशीच स्थिती महिला अटेंडन्टची आहे. विशेष म्हणजे, गरज नसताना विविध अटेंडन्टकडे विविध विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात वैद्यकीय अधीक्षकाचे नियोजन नसल्याचे दिसून येते. परिणामी रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. सध्या बिन्नासह आणखी तीन महिला तर दोन पुरुष मनोरुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. यातील एक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.