शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे पाळण्याचा तुमच्याकडे परवाना आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 10:27 IST

नागरी वस्तीत जनावरे पाळण्याचा परवाना असावा लागतो. तसा कायदाच आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्ष देत नाही. बहुतांश जण विनापरवानाच जनावरे पाळतात अन् त्यांची योग्य देखभालही करत नाही.

ठळक मुद्देमानकापुरात पहिला गुन्हा दाखल-तर कारवाई होऊ शकते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुमच्याकडे जनावरे पाळण्याचा परवाना नाही? मग तुमच्यावर कारवाई होऊ शकते. खरे वाटत नसेल तर चौकशी करा. १३ फेब्रुवारीला मानकापूर पोलिसांनी विना परवाना जनावरे पाळणाऱ्या एका जणावर गुन्हा दाखल केला. हेमंत रामभाऊ आरेकर (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे.अनेक जण जनावरे पाळतात. मात्र, ते त्यांची व्यवस्थित देखभाल करीत नाही. दूध काढले की त्यांना मोकाट सोडून दिले जाते. ही मोकाट गुरे शहरात चक्क रस्त्यावर येऊन बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडसर निर्माण होतो. ते ठिकठिकाणी घाण करून ठेवतात. त्यामुळे स्वच्छतेची वाट लागते अन् आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन लोकमतने काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. त्यावेळी पोलिसांनी महापालिका प्रशासनाच्या मदतीने मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकण्याची विशेष मोहीम राबविली होती. त्यामुळे काही दिवस मोकाट गुरे रस्त्यावर येण्याचे प्रकार थांबले. मात्र आता परत ते जैसे थे झाले आहे. विशेष म्हणजे, नागरी वस्तीत जनावरे पाळण्याचा परवाना असावा लागतो. तसा कायदाच आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्ष देत नाही. बहुतांश जण विनापरवानाच जनावरे पाळतात अन् त्यांची योग्य देखभालही करत नाही. असेच मानकापुरातील श्रीनगरात राहणारे हेमंत आरेकर कोणताही परवाना न घेता २० गाई म्हशी पाळत असल्याचे पोलिसांनी हेरले. त्यामुळे त्यांना प्रारंभी पोलिसांनी सूचना केली. त्यांनी दाद न दिल्यामुळे मानकापूर ठाण्यात आरेकर यांच्याविरुद्ध १३ फेब्रुवारीला सायंकाळी विना परवाना जनावर पाळण्याच्या आरोपाखाली कलम ३, १३ नुसार गुन्हा दाखल केला.

इतरांनी खबरदारी घ्यावी ।हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी इतरांनाही सूचना केली आहे. विना परवाना नागरी वस्तीमध्ये जनावरे पाळून, त्यांची योग्य देखभाल न करणाऱ्यांनी या कारवाईपासून समज घ्यावी, अन्यथा त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जाईल, असे मानकापूर पोलिसांनी कळविले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी