शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

मधुमेहाच्या दुष्परिणामाची वाट पाहू नका : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 8:22 PM

आपण बालमधुमेही असाल तरीही आत्मविश्वास, योग्य शिक्षण व उपचाराच्या मदतीने यावर मात करता येते. औषधोपचार घेताना डॉक्टरांवर विश्वास व आपल्या आरोग्यासाठी सकारात्मकतेची भावना ठेवल्यास मुधमेहासह आनंदी जीवन जगता येते. मात्र, त्यापूर्वी मधुमेह होणारच नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा निरोगी जीवनशैली आत्मसात करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

ठळक मुद्दे ‘डायबेटीज पर विजय’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण बालमधुमेही असाल तरीही आत्मविश्वास, योग्य शिक्षण व उपचाराच्या मदतीने यावर मात करता येते. औषधोपचार घेताना डॉक्टरांवर विश्वास व आपल्या आरोग्यासाठी सकारात्मकतेची भावना ठेवल्यास मुधमेहासह आनंदी जीवन जगता येते. मात्र, त्यापूर्वी मधुमेह होणारच नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा निरोगी जीवनशैली आत्मसात करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.गिल्लूरकर डायबिटीज केअर, ज्येष्ठ नागरिक मंडळ विदर्भ तसेच सरस्वती पॅथॉलॉजी लेबोरेटरी व रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘निरोगी जीवनशैली व मधुमेहावर विजय’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मधुमेहतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या ‘डायबेटीज पर विजय’ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यशाळेच्या उद््घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, मनपाचे सत्तापक्षनेता संदीप जोशी, डॉ. सुनील कांबळे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, चरणसिंह ठाकूर आदी उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी उपस्थितांना मधुमेहाशी लढण्याचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, योग्य आहार, नियमित व्यायाम व औषधोपचार या शिस्तीमुळे मधुमेहाला नियंत्रणात ठेवता येतो. गरज आहे केवळ मधुमेहाशी मैत्री करण्याची. प्रत्येक क्षण आनंदाने जागण्याची, असा सल्ला डॉ. गिल्लूरकर यांनी दिला.कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. किर्तीलता गिल्लूरकर, डॉ. विनोद जयस्वाल, दर्शनी जयस्वाल, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रभू देशपांडे, सचिव अ‍ॅड. अविनाश तेलंग, डॉ. मंजूषा सावरकर, डॉ. बी.आर. आकरे, डॉ. महेंद्र सावरकर, रामरक्षा शाहू, डॉ. एस.एम. जयस्वाल आदींचा सहभाग होता.

टॅग्स :diabetesमधुमेहChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे