शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नका : शासनाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 21:14 IST

मे महिना हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बदल्यांचा काळ. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत व शासन स्तरावरूनही बदलीपात्र अधिकाऱ्यांचा या काळात सर्वाधिक बदल्या होतात. यामुळे दुहेरी पदस्थापना होण्याची शक्यता व तसे झाल्यास न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याचा धोका असतो. परिणामी, ३१ मे पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नये, असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे दुहेरी पदस्थापनेमुळे न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मे महिना हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बदल्यांचा काळ. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत व शासन स्तरावरूनही बदलीपात्र अधिकाऱ्यांचा या काळात सर्वाधिक बदल्या होतात. यामुळे दुहेरी पदस्थापना होण्याची शक्यता व तसे झाल्यास न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याचा धोका असतो. परिणामी, ३१ मे पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नये, असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.राज्यातील वैद्यकीय व आरोग्य सेवा ‘गट-अ’ या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हांतर्गत बदल्या करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत. त्यानुसार समितीकडून लोकसभेची आदर्श आचारसंहिता संपुष्टात येताच बदलीसपात्र असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्ह्यांतर्गत बदली करण्यात येणार होती. सोबतच शासन स्तरावरही बदली होणार होती. यामुळे मोठ्या प्रमाणात दुहेरी पदस्थापना होण्याचा शक्यता होती. शिवाय, दुहेरी पदस्थापनेमुळे न्यायालयीन प्रकरणे सामोर येण्याचीही भीती होती. यामुळे मे महिन्यापर्यंत बदल्या न करण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.सूत्रानूसार, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय संघटनेच्या (मॅग्मो) पदाधिकाऱ्यांनी चार महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाचे आयुक्त अनुपकुमार यादव यांच्या भेट घेतली. यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून आरोग्य अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. समितीकडून बदल्या झाल्यानंतर शासनाकडूनही बदल्या होत असल्याने गोंधळ उडत असल्याचे मत मांडण्यात आले होते. त्याला घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरTransferबदली