शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांना पाठीशी घालू नका

By admin | Updated: May 11, 2017 02:49 IST

जमिनीच्या वादासंबंधीच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या. कारवाईच्या संबंधाने अडचण होत असेल

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका : पोलीस ठाण्यांना सूचनावजा इशारा नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जमिनीच्या वादासंबंधीच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या. कारवाईच्या संबंधाने अडचण होत असेल तर संबंधित वरिष्ठ आणि तज्ज्ञांची मदत घ्या. मात्र, कारवाई करण्यास टाळाटाळ करून भूमाफियांना मदत होईल, अशी भूमिका घेऊ नका, असा खणखणीत सूचनावजा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शहरातील पोलिसांना देण्यात आला आहे. या भूमिकेमुळे भूमाफिया ग्वालबन्सीचे साम्राज्य उद्ध्वस्त करतानाच पोलिसांनी आता उपराजधानीतील अन्य भागातील भूमाफियांवरही नजर रोखल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भूमाफियांसोबतच त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांमध्येही खळबळ निर्माण झाली आहे. स्वप्नातील घर निर्माण करण्यासाठी अनेकांचे आयुष्य खर्ची पडते. आयुष्यभर राबराब राबल्यानंतर त्यातील मिळकतीतून अनेकजण भूखंड विकत घेतात. भविष्यात आर्थिक जुळवाजुळव झाल्यानंतर त्यावर घर बांधू, असे स्वप्न रंगवून भूखंड मालक पुढच्या जुळवाजुळवीचे प्रयत्न करतात. मात्र, त्यावर ग्वालबन्सीसारखे भूमाफिया आपल्या गुंडांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून रातोरात कब्जा करतात. तेथे कुंपण टाकून आपला मालकी हक्क दाखवणारा फलकही लावतात. कधीतरी एखादवेळी भूखंडाकडे चक्कर टाकायला आलेल्या भूखंड मालकाला ते पाहून जबर मानसिक धक्का बसतो. तो आधी त्या फलकावर लिहिलेल्या नावाच्या व्यक्तीशी संपर्क करतो. त्याच्याकडून अपमान आणि मनस्ताप मिळाल्यानंतर संबंधित भागातील पोलीस ठाण्यात जातो. मात्र, पोलीस अशा प्रकरणापैकी ९० टक्के प्रकरणात पीडित व्यक्तीकडून अतिक्रमण करणाऱ्याचे नाव, पत्ता विचारल्यानंतर त्याच्याशी संपर्क करतात अन् नंतर तक्रार घेऊन येणाऱ्यांना टरकावून लावतात. त्याच्या हाती एनसी (अदखलपात्र) पावती देऊन ‘हे प्रकरण आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. तुम्ही कोर्टात जा’ असा सल्ला देऊन पीडित व्यक्तीची बोळवण करतात. काही प्रकरणात कब्जा करणाऱ्याला (भूमाफियाला) बोलवून ‘समेट’ करण्याच्या नावाखाली पीडित व्यक्तीची मानसिक आणि आर्थिक कोंडी करण्याचेही प्रयत्न होतात. अशी हजारो प्रकरणे शहरात झाली असून, या प्रकरणातून ग्वालबन्सीसारखे अनेक भूमाफिया शहरात तयार झाले आहेत. या भूमाफियांमुळे अनेक जण अक्षरश: उद्ध्वस्त झाले असून, अनेकांनी जीवही दिले आहेत. ग्वालबन्सी प्रकरणातून त्याची प्रचितीही आली आहे.