शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्यापीठातील विकास कामे थांबवू नका : हायकोर्टाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील पायाभूत विकास कामे थांबविण्यात येऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. तसेच, या विकास कामांना आचारसंहिता लागू होणार नाही, असे स्पष्ट केले.

ठळक मुद्देआचारसंहिता लागू होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील पायाभूत विकास कामे थांबविण्यात येऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. तसेच, या विकास कामांना आचारसंहिता लागू होणार नाही, असे स्पष्ट केले.यासंदर्भात विधी विद्यापीठाने अर्ज दाखल केला होता. विद्यापीठातील विविध पायाभूत विकास कामांसाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागांची मंजुरी आवश्यक आहे. परंतु, आचारसंहितेमुळे सर्व प्रकारच्या मंजुरी थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी, विद्यापीठातील विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारला आवश्यक निर्देश देण्यात यावेत, असे विद्यापीठाचे म्हणणे होते. न्यायालयाने विद्यापीठाचा अर्ज मंजूर करून सरकारला वरील आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.विधी विद्यापीठातील पायाभूत सुविधा लवकर पूर्ण व्हाव्यात व वेळोवेळी पुढे येणारे प्रश्न तातडीने सुटावे याकरिता हायकोर्ट बार असोसिएशनच्यावतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात विद्यापीठाने हा अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आवश्यक आदेशांमुळे विधी विद्यापीठ २०१६-२०१७ सत्रापासून कार्यान्वित झाले. विद्यापीठ कॅम्पसकरिता वारंगा येथे ६० एकर जमीन मिळाली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह मिळाले. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. याशिवायही विविध प्रश्न मार्गी लागले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयElectionनिवडणूक