शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

निर्जतुकीकरण डोम किंवा टनेल नको  :  केंद्र सरकाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:00 IST

‘कोविड-१९’च्या पार्श्वभूूमीवर काही कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तर काही विशिष्ट रस्त्यावर निर्जंतुकीकरण ‘डोम’ किंवा ‘टनेल’ तयार करण्यात आले आहे. परंतु अशा ‘सॅनिटेशन डोम’चा कोणताही शास्त्रीय आधार नाही. शिवाय यात वापरले जाणारे रसायने व्यक्तीला अपायकारक देखील ठरू शकतात.

ठळक मुद्देआरोग्य सेवा संचालनालयाने काढले पत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूूमीवर काही कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तर काही विशिष्ट रस्त्यावर निर्जंतुकीकरण ‘डोम’ किंवा ‘टनेल’ तयार करण्यात आले आहे. परंतु अशा ‘सॅनिटेशन डोम’चा कोणताही शास्त्रीय आधार नाही. शिवाय यात वापरले जाणारे रसायने व्यक्तीला अपायकारक देखील ठरू शकतात. यामुळे असे रसायन फवारणी करणारे ‘डोम’ किंवा ‘टनेल’ निर्माण करू नये, असे केंद्र शासनाचे निर्देश असल्याचे पत्र आरोग्य सेवा संचालनालयाने काढले आहे.विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) या विषयी सूचना केल्या आहेत. त्यांच्या मते, निर्जंतुकीकरण करणारे टनेल स्थापन केल्यास कोरोनाची लागण होणार नाही, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. चेन्नई सार्वजनिक आरोग्य विभागानेही या विषयी असे न्तिुाजुकीकरण ‘डोम’ किंवा ‘टनेल’ निर्माण करू नका, अशा सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत नागपुरात काही पोलीस ठाण्याच्या व्हॅनमध्ये सॅनिटेशन करणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. नंदनवन वसाहतीमध्ये असेच एक ‘टनेल’ सुरू करण्यात आले होते. तर गिट्टीखदान येथील एका व्यक्तीने असे ‘सॅनिटेशन टनेल’ तयार करून जिल्हाधकाऱ्यांकडे सुपूर्द केले होते. तज्ञ्जानुसार या ‘टनेल’ किंवा ‘डोम’मध्ये फवारणी करण्यासाठी वापरले जाणारे अतिरीक्त रसायन जसे अल्कोहल, क्लोरीन, लॉयसॉल हानिकारक असते. निर्जंतुकीकरणात याचा किती फायदा होतो, हे अद्यापही सामोर आले नाही. परंतु ही रसायने हानी पोहचवू शकतात. यामुळे केंद्र शासनाने असे टनेल किंवा डोम किंवा त्यासदृश यंत्रणांचा वापर करण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहे, अशी माहिती आरोग्य सेवा संचालकांनी आपल्या पत्रातून दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर