शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता शासनक र्त्या व्हा! स्मिता काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:26 IST

‘सुपर मॉम’, ‘सुपर वूमन’ असे लेबल लावत महिलांचे मार्केटिंग केले. प्रत्यक्षात कुणीही सुपर नसतो. स्त्रीचे सौंदर्य हे दिसण्यात नाही तर तिच्या कर्तृत्वात आहे. त्यामुळे महिलांनी सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता व्यवस्था चालविणारे शासनकर्ते व्हावे, असे आवाहन महिला उद्योजिका मेळाव्यात धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी रविवारी केले.

ठळक मुद्देउद्योजिका मेळाव्यात महिलांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुपर मॉम’, ‘सुपर वूमन’ असे लेबल लावत महिलांचे मार्केटिंग केले. प्रत्यक्षात कुणीही सुपर नसतो. स्त्रीचे सौंदर्य हे दिसण्यात नाही तर तिच्या कर्तृत्वात आहे. त्यामुळे महिलांनी सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता व्यवस्था चालविणारे शासनकर्ते व्हावे, असे आवाहन महिला उद्योजिका मेळाव्यात धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी रविवारी केले.महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व समाजकल्याण विभागाच्यावतीने शहर समृद्धी उत्सवांतर्गत आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या तिसऱ्या दिवसाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, सरिता कावरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव आदी उपस्थित होते.तत्पूर्वी महिला सशक्तीकरणाची मशाल पेटवून तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर स्वच्छ नागपूर, ग्रीन नागपूर, सुंदर नागपूर असा संदेश असलेला बलून मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आला. दुपारी महिलांची क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. यात विजयी ठरलेल्या रूपमंत्रा संघाला पाहुण्यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. संचालन व आभारप्रदर्शन स्मिता खनगई यांनी केले.तिसऱ्या दिवसाच्या सत्कारमूर्तीमेळाव्याच्या तिसऱ्या दिवशीही पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनातून प्रबोधन करणाऱ्या मृण्मयी अमर कुलकर्णी, दृष्टिबाधित असतानाही योग, नॅचरोपॅथी, संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या जिज्ञासा कुबडे, २२ वर्षांपासून निराधारांची सेवा करणाऱ्या व त्यांना आश्रय देणाऱ्या निशिगंधा रामटेके, परागकणांवर पीएच.डी. करणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मंगला गावंडे, संवेदना संस्थेच्या माध्यमातून स्वमग्न मुलांसाठी कार्यरत ज्योती फडके आदींचा सत्कारमूर्तीत समावेश होता.प्रिन्स डान्स ग्रुपचा धमाकाइंडियाज गॉट टॅलेंट फेम ओडिशा येथील प्रिन्स डान्स ग्रुपने आपल्या विविध प्रकारातील नृत्याने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रारंभीच सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने प्रेक्षकांना देशभक्तीचे स्फुरण चढविले. त्यानंतर एकापेक्षा एक सादर केलेल्या सरस सादरीकरणाने रसिकांचे मनोरंजन केले.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर